पुणे- येत्या तीन दिवसांत मान्सूनचे राज्यात आगमन होण्यास अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मराठवाड्यात १७, १८ १९ जूनला पावसाचा अंदाज आहे.
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा कायम असली तरी मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल ‘सिस्टिम्स’ अरबी समुद्र बंगालचा उपसागरात विकसित होत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास येत्या दिवसांत मान्सूनचे राज्यात आगमन होईल. येत्या तीन दिवसांत नैऋत्य मान्सूनची वाटचाल मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, संपूर्ण कोकण गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बराच भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, किनारी भागात होऊ शकते, असे आयएमडीने म्हटले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)