आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय सेना-चीनच्या पीपल्स आर्मीचा पुण्यात लष्करी सराव, जवानांनी सादर केली चित्तथरारक प्रात्यक्षिके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय सेना व चीनच्या पीपल्स लिबरेशन अार्मीदरम्यान सहावा ‘हँड इन हँड’ लष्करी सराव पुण्यातील अाैंध मिलटरी स्टेशन येथे शुक्रवारी उत्साहात पार पडला. दहशतवादाचा बीमाेड करण्यासाठी दाेन्ही देशांच्या लष्कराच्या जवानांनी संयुक्तरीत्या १३ दिवस सराव केला. दाेन्ही देशांतील निम्नवर्गीय शहरांमधील दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी, एकत्रितरीत्या नियाेजन करणे या उद्देशाने, दाेन्ही देशांच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके या वेळी सादर केली.
चीनच्या लष्कराचे मेजर जनरल वांग हायचिंग व भारतीय लष्कराचे मेजर जनरल एस.के.प्राशार यांनी संयुक्तरीत्या लष्करी संचलनाची पाहणी केली. व्यावसायिकरीत्या िनयाेजनबद्ध पद्धतीने दाेन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादविराेधी सरावाचे अायाेजन केल्याने जवानांचा अात्मविश्वास उंचावल्याचा निष्कर्ष दाेन्ही देशांच्या निरीक्षकांनी व्यक्त केला. दहशतवाद विराेधात दाेन्ही देशांनी एकत्रितरीत्या काम करण्याचे महत्त्वही सदर लष्करी सरावामुळे अाधाेरेखित झाले अाहे.

दाेन्ही देशांतील समस्या सुटाव्यात : भारत अाणि चीन दाेन्ही शेजारी देशांनी एकत्र येऊन अापापसातील अांतरराष्ट्रीय व प्रादेशिक समस्या साेडवाव्यात, असे प्रतिपादन चिनी लष्कराचे डेप्युटी कमांडर मेजर जनरल वांग हायचिंग यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, या सरावामुळे
केवळ लष्करीदृष्ट्या नाही तर दाेन्ही देशातील नातेसंबंध सुधारण्यास मदत झाली अाहे. यामध्ये एकमेकांची शस्त्रे त्याचे तंत्र समजण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...