आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन बँकेत बनावट चेक भरून 19 लाखांची फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विमाननगर येथील इंडियन बॅँकेत बनावट चेक भरून एका अज्ञात व्यक्तीने 19 लाखांची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुंदररामन जयरामन अय्यर यांनी तक्रार दाखल केली आहे. इंडियन बॅँकेचे बनावट चेक तयार करून अज्ञाताने स्वत:चे खाते जिनकुश्न फेब या नावाने भिवंडी येथील एचडीएफसी बॅँकेत उघडले. त्यानंतर इंडियन बॅँकेचे बनावट पाच चेक तयार करून ते पुण्यातील एचडीएफसी बॅँकेच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये भरले.

गुजरातमधील इंडिया बॅँकेचे बॉलसन पॉलिप्लास्ट प्रा.लि. कंपनीच्या खातेधारकाच्या खोट्या सह्या त्यावर करण्यात आल्या होत्या. अशाप्रकारे बॅँकेच्या गुजरात येथील खातेधारकाची फसवणूक झाली. एकूण 19 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाली.