आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट‌्सअॅपला देशी पर्याय; पुण्यातील तरुणाची गरुडझेप, ‘मेक इन इंडिया’च्या मोहिमेत पुढे पाऊल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओतूर- शेतकरी असो किंवा व्यावसायिक, आधुनिक काळात स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. या स्मार्टफोनवर रोज नवीन विश्व अवतरत असताना पुणे शहरातील बिबवेवाडी येथील पंकज साळुंखे या तरुणाने ‘टॉकबिझ’ नावाचे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ॲप विकसित करून स्वदेशीच्या नाऱ्याला हातभार लावला आहे. शिवाय, व्हॉट‌्सअॅपसारख्या अॅपला देशी पर्याय दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’च्या घोषणेतून प्रेरणा घेत संगणकतज्ज्ञ असलेल्या पंकज यांनी अहोरात्र मेहनत करत ‘टॉकबिझ’ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ॲप तयार केले. परदेशी बनावटीच्या व्हॉटस्अॅपला ‘टॉकबिझ’च्या रूपाने पर्याय उपलब्ध करून दिला. केवळ महिनाभरात लाख भारतीयांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.या ॲपमध्ये फेसबुकसह इतरही ॲप एकत्रित मिळतील. अनेक बेरोजगारांना हे ॲप रोजगाराची संधी निर्माण करून देईल. 

स्वदेशीसाठी जिद्द 
स्मार्टफोनमुळेसोशल मीडिया संकल्पनाही बळकट झाली. संवाद वाढला. जग जवळ आले. मात्र, हे संवादासाठी वापरले जाणारे अॅप परदेशी बनावटीचे होते. असे एक प्रभावी देशी अॅप असावे, या जिद्दीतून पंकज साळुंखे यांनी मनोमन खूणगाठ बांधली. 

अशी आहेत ॲपची वैशिष्ट्ये 
- ‘बेरोजगारांसाठी संधी. रोजगाराला मिळेल चालना. 
- वर्ड मेसेज तुम्ही ऐकू शकता. आलेल्या मेसेजखालील बटनाला टच केल्यानंतर वर्ड टू व्हॉइसद्वारे मेसेज ऐकू येतो. 
- मेसेज शेड्यूल. मित्राला किंवा नातलगांना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता शुभेच्छा देणारा मेसेज टाइम शेड्यूल करा. तुमचा मेसेज बरोबर १२ वाजता पोहोचेल. 
-‘टॉकबिझ’वर डीपी ठेवण्यासाठी मल्टिपल सुविधा. 
-‘टॉकबिझ’वरूनही पोस्ट टाकण्याचीही सुविधा. 
बातम्या आणखी आहेत...