आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायपीएस अकादमीत नगरच्या अधिकाऱ्याला मानाची छडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल पाेलिस अकादमीत भारतीय पाेलिस सर्व्हिसचे (अायपीएस) खडतर प्रशिक्षण प्रशिक्षार्थींना िदले जाते. अायपीएसच्या ६८ व्या बॅचमधील १०९ अधिकाऱ्यांचा नुकताच दीक्षांत समारंभ पार पडला. यात अहमदनगरचा ऋषिकेश भगवान साेनवणे या महाराष्ट्रीय अधिकाऱ्याने अष्टपैलू कामगिरी करत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते दीक्षांत संचलनाचे नेतृत्व करणारी मानाची पंतप्रधानांची छडी हाेम मिनिस्टर रिव्हाॅल्व्हरचा िकताब पटकावला अाहे.

विनायक अापटे (१९९४), परीस देशमुख (२०१०) या महाराष्ट्रीय अायपीएस अधिकाऱ्यांच्या अष्टपैलू कामगिरीनंतर साेनवणे यांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची माेहोर पुन्हा एकदा हैदराबाद येथील अायपीएस अकादमीत उमटली अाहे.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेले ऋषिकेश साेनवणे हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी अाहेत. त्यांची शैक्षणिक कारकीर्द प्रेरणादायी असून दहावी अाणि बारावीच्या परीक्षेत त्यांनी बाेर्डाच्या यादीत येण्याचा बहुमान मिळवला अाहे. बारावीला ते पुणे विभागात प्रथम हाेते. त्यानंतर पुण्यातील काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंग (सीअाेर्इपी) मधून त्यांनी २००६ मध्ये ‘इलेक्ट्राॅनिक्स टेलिकम्युनिकेशन’ मध्ये बीईची पदवी संपादन केली अाहे. पदवी प्राप्त केल्यानंतर साॅफ्टवेअर इंडस्ट्रीत त्यांनी बंगळुरू येथे दाेन वर्षे काम केले. यादरम्यानच्या काळात दक्षिण काेरियातही काम करण्याची संधी त्यांना मिळाली. मात्र, देशसेवेच्या ध्येयाने त्यांनी चांगल्या पगाराची नाेकरी साेडून केंद्रीय लाेकसेवा अायाेगाचा (यूपीएससी) अभ्यास सुरू केला.
यूपीएससीच्या परीक्षेत २०११ मध्ये त्यांची ‘इंडियन ट्रेड सर्व्हिस’ पदासाठी िनवड झाली. या सेवेत त्यांना वाणिज्य मंत्रालयाचा भाग असलेल्या डायरेक्टर जनरल अाॅफ फाॅरेन ट्रेडमध्ये दाेन वर्षे काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणीही त्यांनी अापल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला. याच वेळी यूपीएससीची परीक्षा देत असताना २०१३ मध्ये त्यांची ‘इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस कस्टम अँड सेंट्रल एक्साइज’ (अायअारएस) मध्ये निवड झाली. अायअारएसचे प्रशिक्षण सुरू असतानाच त्यांची पुढील वर्षीच म्हणजेच २०१४ मध्ये अायपीएस पदासाठी निवड झाली. यूपीएससी परीक्षेचा जुना नवीन पॅटर्न त्यांनी जवळून अनुभवल्याने यूपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी यासाठी त्यांनी ‘यूपीएससी डिकाेडेड’ पुस्तकाचे लिखाण केले.

जिद्द न साेडता प्रयत्न करा
ऋषिकेश साेनवणे ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाले, यूपीएससी अभ्यासाचा अावाका माेठा असताे निकालाची टक्केवारी खूप कमी असते. अशा वेळी मनाचे संतुलन बिघडता विद्यार्थ्यांनी जिद्द कायम ठेवून तसेच अभ्यासात सातत्य राखून प्रयत्न केले पाहिजेत. यूपीएसीसीची सहा वेळा मुलाखत मी िदली. त्यापैकी तीनदा माझी निवड झाली. यादरम्यानच्या काळात अनेक चांगले-वाईट अनुभव अाले. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळे ४५ अाठवड्यांच्या खडतर पाेलिस प्रशिक्षणात अष्टपैलू कामगिरी मला बजावता अाली.’
बातम्या आणखी आहेत...