आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Tourism Benefited Due To Increase In Price Of Dollar

डॉलर वधारल्याने देशांतर्गत पर्यटन बहरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय रुपयाची घसरण वाढत गेल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पर्यटनावर झाला असल्याचे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे.

विशेषत: सहलींसाठी विदेशांना भेटी देणा-या भारतीय पर्यटकांमध्ये लक्षणीय घट झाली असल्याचा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. हॉटेल - रिसॉर्ट व्यावसायिक, कार रेंटल, विमानकंपन्या आदींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया (असोचेम) या संस्थेने हे सर्वेक्षण मांडले आहे.


20 टक्के भारतीय पर्यटकांनी विदेशात सहलीला जाण्याचे बेत रद्द केले. रुपया साठीपार गेल्याचा परिणाम.


20 ते 25 टक्के स्थानिक पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट. पर्यटकांचा देशांतर्गत पर्यटनाकडे ओढा.


रेंट कारला मागणी वाढली
देशात फिरण्यासाठी आयत्यावेळी रेल्वे आरक्षण उपलब्ध होत नाहीत. तसेच विमानप्रवास महागल्याने बहुतेकांचा भर रेंट कारवर आहे, असे निरीक्षण ‘सवारी डॉट कॉम’चे संचालक गौरव आगरवाल यांनी नोंदवले. गेल्या दीड महिन्यापासून कार रेंटचे प्रमाण सुमारे 30 टक्क्यांनी वाढले आहे. उत्तराखंडमधील आपत्तीच्या पार्श्वभूमीवर हे प्रमाण लक्षणीय मानावे लागेल. चार ते पाच जणांच्या कुटुंबासाठी कार भाड्याने घेणे परवडते. आपल्या आवडीनुसार कारची निवड तसेच शोफरसह गाडी मिळत असल्याने सहलीचा आनंद वाढतो, असे आगरवाल यांनी सांगितले.