आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील 12 वी उत्तीर्ण महिलेने FACEBOOK मध्ये शोधला BUG; कंपनीचे दिले 1000 डॉलर बक्षिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- संपूर्ण जगाला एका क्लिकवर एकत्र आणणार्‍या 'फेसबुक'मध्ये 'बग' (एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्राममधील त्रुटी किंवा चूक) असू शकतो, हे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील एका महिलेने सिद्ध केले आहे. विजेता पिल्लई असे या महिलेचे नाव असून तिने वर्कप्लेस अॅपमध्ये त्रुटी शोधून काढल्याने तिला 65000 रुपयांचे (1000 डॉलर) बक्षिस जाहीर झाले आहे.

सोशल मीडियातील दिग्गज वेबसाईट 'फेसबुक'च्या वर्कप्लेस'मध्ये त्रुटी शोधून काढणारी विजेता ही भारतातील पहिलीच महिला आहे. ती पुण्यातील रियल्ट्री प्रॉप कंपनीत 'सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह' पदावर कार्यरत आहे.

विजेताने 'दिव्य मराठी'ला सांगितले की, फेसबुकने नुकतेच आपले बिझनेस चॅटिंग अॅप 'वर्कप्लेस' लॉन्च केले होते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हे अॅप सर्वाधिक वापरले जाते. वर्कप्लेसमध्ये बग आढळल्याने हे अॅप वापरणार्‍या कंपनीच्या सुरक्षिततेलाही धोका पोहोचू शकतो. विजेताने ही चूक फेसबुकच्या निदर्शनास आणून दिली.

असा शोधला 'बग'...
विजेताने सांगितले की, ती सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही. तसेच तिला तंत्रज्ञानाचे फारसे ज्ञानही नाही. परंतु तिने फेसबुक वर्कप्लेस वापरले असता तिला बग आढळून आला. ती सुरुवातीला गोंधळून गेली. तिने मित्राला फोन करून सगळा प्रकार सांगितला. मित्राने आधी तिचे अभिनंदन केले. तिला सांगितले की, तू फेसबुकची मोठी चूक शोधून काढली आहेस. तुला या बदल्यात कंपनी बक्षिसही देईल.' मित्राचे हे शब्द ऐकताच मोठा आनंद झाला.

फेसबुकला चूक मान्य...
वर्कप्लेसमध्ये बग आढळून आल्याची माहिती विजेता यांनी तत्काळ 'फेसबुक'ला सूचित केले. रिव्ह्यू घेतला असता बग फेसबुकच्याही लक्षात आला. विजेता हिने 'वर्कप्लेस'मधील गंभीर त्रुटी शोधून काढली आहे, ही त्रुटी एखाद्या अॅडमीनसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकली असती, असेही फेसबुकने म्हटले आहे.

वर्कप्लेस हे फेसबुक सारखेच वापरता येते. या माध्यमातून यूजर्स पोस्ट, कमेंट आणि मेसेज पाठवू शकतो. परंतु, या अॅपचा वापर केवळ संस्थेचे कर्मचार्‍यांपर्यंतच मर्यादीत असतो. या अॅपला अॅडमिन संस्थेतील इतर कर्मचार्‍यांना कंपनीच्या थेट अकाउंटशी जोडतो.

पुढील स्लाइड्‍वर क्लिक करून वाचा... कोण आहे विजेता पिल्लई?
बातम्या आणखी आहेत...