आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India\'s Most Wanted Terrorist, Has Been Arrested Today From India Nepal Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यासिन भटकळने तीन वर्षे केली जर्मन बेकरी स्फोटाची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इंडियन मुजाहिदीनचा मास्टर माईंड यासिन भटकळ अखेर जेरबंद झाला आहे. भटकळला राष्ट्रीय तपास संस्थाच्या (एनआयए) पथकाने नेपाळमधून अटक केली आहे. पुण्याच्या जर्मन बेकरी आणि मुंबईतील लोकल बॉम्बस्फोटांप्रकरणी देशातील सर्व तपास यंत्रणांना तो हवा होता.

सध्या बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भटकळचे आयुष्य रंजक होते. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी 2008 मध्ये तो बिहारच्या दरभंगा येथे हकिम म्हणून राहात होता. कर्नाटकातून चार मित्रांसह त्याने दिल्ली गाठली होती. दिल्लीतील बाटला हाऊस येथील एका इमारतीमध्ये त्यांचा मुक्काम होता. विद्यार्थी दशेत त्याचे नाव गौहर होते. भटकळने इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले होते. या दरम्यानच त्याचा दहशतवाद्यांशी संपर्क झाला होता.

यासिन भटकळला पुण्यामध्ये शेवटचे 2008 मध्ये पाहिले गेले होते. या दरम्यानच त्याने जर्मन बेकरी स्फोटाची रेकी आणि प्लान तयार केला होता. इंडियन मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक अशीही त्याची ओळख आहे.