आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indica Car Accident At Pune In Pimple Gurav Area

पुण्यात मोटार अपघातात दोन ठार, सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील पिंपळे गुरळ येथे काल रात्री एका इंडिका मोटारीने पादचारी, रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने सहा महिन्यांच्या मुलीसह एकाचा मृत्यू झाला आहे. पिंपळे गुरवमधील सुदर्शन चौकात हा अपघात झाला.
स्वरा संदीप सुर्वे ( वय 6 महिने, रा. काळेवाडी) आणि दुचाकीस्वार हेमंत रामदास दिघे ( वय 47, रहाटणी) अशी मृतांची नावे आहेत. स्वरा हिची आई सविता व आजी सुनदा या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रिक्षाचालक चंद्रकांत जिरंगे ( 45, नवी सांगवी) हे ही अपघातात जखमी झाले आहेत.
सुनंदा, सविता या सासू-सूना स्वरासह एका कार्यक्रमासाठी नातेवाईकाकडे गेल्या होत्या. त्या परतत असताना रस्त्यावर त्यांना इंडिका कारने जोरात धडक दिली. यात स्वराचा जागीच मृत्यू झाला. तर सासू-सूना जखमी झाल्या. अपघातामुळे घाबरलेला इंडिका कारचा चालक तसाच वेगाने पुढे निघून गेला. मात्र, पुढच्याच चौकात त्याने दुचाकीस्वार व रिक्षाला जोराची धडक दिली. त्यात हेमंत दिघे हा दुचाकीस्वार ठार झाला तर रिक्षाचालक जिरंगे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औंध रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुढे पाहा, अपघातातील छायाचित्रे......