आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industralist Ajit Gulabchand Says As A Pm Modi Is Best Option For India

पवारांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद म्हणतात, पीएमसाठी मोदी उत्तम पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उद्योगपती व लवासाचे प्रवर्तक अजित गुलाबचंद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला असून, पंतप्रधान म्हणून देशापुढे नरेंद्र मोदींचा उत्तम पर्याय आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना अजित गुलाबचंद यांनी हे वक्तव्य केले. अजित गुलाबचंद हे शरद पवारांचे निकटवर्तीय असून, पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट लवासाचे ते मुख्य प्रवर्तक आहेत. दरम्यान, पवारांच्या निकटवर्तीयांनी असे भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
अजित गुलाबचंद आज पुण्यात आहेत. ते खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, देश बिकट परिस्थितीतून जात आहे. देशात मंदीचे वातावरण आहे. येत्या काळात देशात व राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचाही फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे. मात्र, लवकरच वातावरण निवळेल व परिस्थिती पूर्ववत होईल. देशापुढे नरेंद्र मोदींचा उत्तम पर्याय असल्याचे सांगून गुलाबचंद म्हणाले, मोदी हे खुलेआम सर्व विषयावर बोलतात. अर्थव्यवस्थेवर भाष्य करतात. ते मार्केट फ्रेंडली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते आक्रमक असून सर्व निर्णय स्वत: घेतात. असे राजकीय नेतृत्त्व देशासाठी पूरक ठरणार असून, त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून देशासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.