आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला 12वीत कमी गुण मिळाल्याने वडिलांनी केली आत्महत्या, पिंपरी चिंचवड़मधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड़ - पिंपरी चिंचवड़मध्ये बारावीच्या परिक्षेत मुलाला कमी गुण मिळाले या कारणावरुन पित्याने राहत्या घरी गळपास घेवून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज संध्याकाळी 6 वाजता पिंपरी गाव येथे घडली आहे.
 
विश्वंबरम माधवन पिल्ले (वय.48 रा. सुकवानी कस्टल, पिंपरीगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्ले यांचा मुलगा विज्ञान शाखेमध्ये शिकत होता. आज बारावीचा निकाल होता. त्यामुळे घरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते. त्यात मुलाला 71 टक्के गुण मिळाले. हे विश्वंबरम यांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण होते. त्यामुळे त्यांनी घरातील बाथरुममध्ये जाऊन शॉवरला ओढणीने गळफास घेतला, असे नातेवाईकांनी सांगितले आहे.
 
विश्वंबरमयांचे भोसरी परिसरात एक वर्कशॉप आहे. व्यवसायात त्यांना नुकसान झाले होते आणि त्याचबरोबर मुलाने बारावीमध्ये चांगले गुण घेणे अपेक्षीत होते. मात्र तसे न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा.. 
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...