आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय सुंदर आहे अमिताभ यांचे हे राष्ट्रगीत, ऐकून व्हाल भावूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मूक-बधिर लोकांसाठी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीताचा एक अनोखा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ कोल्हपूरच्या केशवराव भोसले सभागृहात प्रदर्शित करण्यात आला. हा व्हिडिओ पाहून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील अत्यंत भावूक झाले होते...

काय खास आहे या व्हिडिओत...
- या व्हिडिओमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी दिव्यांग मुलांसोबत सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताचे सादरीकरण केले आहे. यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत संस्थेतील सात मुलांनी साष्ट्रगीत गायले आहे.
- ते सर्व आपल्या दोन्ही हातांच्या इशाऱ्यांमधून राष्ट्रगीत सादर करत आहेत. पार्श्वसंगीतात राष्ट्रगीताचे संगीत सूरू आहे आणि मुकबधिर मुले हे गीत गात आहेत.
- कोल्हापूरची चेतना अपंगमति संस्था आणि नवी दिल्ली येथील वुई केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत तयार करण्यात आले आहे.
- या व्हिडिओचे बॅकग्राउंड स्कोअर म्यूझिक कंपोजर स्वर्गीय आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे. 3:35 मिनीटांच्या या व्हिडिओचे दिगदर्शन प्रसिध्द दिगदर्शक गोविंद निहलानी यांनी केले आहे.
- कोल्हापूर येथे आयोजित या समारंभाच्या वेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि महापोर हसिना फरास उपस्थित होत्या.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हि़डिओ...
- हा व्हिडिओ मानव संसाधन विकस मंत्रालयाद्वारे प्रसारीत करण्यात आला आहे.
- हा व्हिडिओ रिलीज होताच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 
- या व्हिडिओत दिसणारे अमिताभ बच्चन आणि मुलांच्या अभिनयाची प्रशंसा होत आहे. काही लोकांनी याला 70 वर्षातील सर्वात सुंदर व्हिडिओ म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा या राष्ट्रगीताशी निगडीत आणखी काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...