आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसच्या कर्मचार्‍याची प्रेमप्रकरणातून आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इन्फोसिस कंपनीत काम करत असलेला विवेक लक्ष्मण पोतदार (29) याने प्रेमप्रकरणातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना वारजे येथील लक्ष्मीनारायण सोसायटीत घडली. विवेक मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असून तो एक वर्षापासून पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या मृतदेहाजवळ मुलीचा फोटो पोलिसांना सापडला असून त्यावर ‘आय लव्ह यू ऑलवेज’ लिहिले आहे. त्या मुलीचे मिसकॉल त्याच्या मोबाइलवर आढळून आले आहे. पोलिस संबंधित मुलीकडे अधिक चौकशी करत असून विवेकने पिस्तूल कोठून आणले याचा तपास केला जात आहे.