आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसच्या इमारतीवरून उडी घेऊन अभियंत्याची आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हिंजवडी येथील इन्फोसिस या सॉफ्टवेअर कंपनीच्या इमारतीवरून उडी मारून एका संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. निखिल शेखर धोते (वय 23, रा. हिंजवडी) हा युवक इन्फोसिस कंपनीत काम करत होता. मंगळवारी सकाळी त्याने इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आमदार सुभाष धोते यांचा तो पुतण्या होत. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.