आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Initiative Started For Strictly Implementation Of Auto Rickshaw Fares By Meter Within Pimpri Chinchwad Corporation

पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा मीटरसक्तीसाठी \'ऑनलाईन\' स्वाक्षरी मोहिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी-चिंचवड परिसर हा एक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पुढे आले आहे. वाढते औद्योगिककरण, आयटी सीटी म्हणून ओळखला जाणारा हिंजवडीसारख्या भाग यामुळे या शहरात देश-विदेशातील लोक वास्तव्यास आले आहेत. आयटीमुळे हे शहर रात्र-दिवस वाहत असते व गजबजलेले असते. मात्र, या शहरात अद्याप रिक्षा व्यावसायिकांनी मीटर सक्ती लागू न केल्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास व बुर्दड बसत आहे. ठराविक भागातच जाणे व अव्यवहार्य पैशांची मागणी करणे यामुळे महिला वर्गासह अबाल वृद्ध यांची लुट होत आहे. यातून सुटका करण्यासाठीच पिंपळे सौदागर येथील 'रोझलॅंड रेसिडेन्सी' आणि 'पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम'ने या अन्यावाला वाचा फोडत रिक्षा मीटरसक्तीसाठी 'ऑनलाईन स्वाक्षरी मोहिम' सुरु केली आहे. स्वाक्षरी मोहिमेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, पुणे शहर पोलिस आयुक्त सतीश माथूर, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांना निवेदन पाठपुरावा करण्यात येणार आहे.
या ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरमने केले आहे. याद्वारे रिक्षा व्यावसायिक व सरकारी पातळीवर दाद मागून दबाव वाढवून सामान्यांचा त्रास कमी केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी व्हावे असे फोरमने म्हटले आहे. http://goo.gl/W6ykcM या लिंकवर स्वाक्षरी मोहिमेची पिटीशन उपलब्ध आहे.
याबाबत रोझलॅंड रेसिडेन्सी या रहिवाशी सोसायटीचे अध्यक्ष संतोष म्हसकर म्हणाले, पिंपळे-सौदागर भागातील नागरिकांनी पोलिस आणि रिक्षाचालक यांची एक बैठक घेऊन रिक्षा मीटरसक्तीची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले होते. मात्र, रिक्षा व्यावसायकांनी किरकोळ कारणे देऊन व वाद करून मीटर पद्धत बंद पाडली. तसेच रिक्षाचालकांनी अर्धा दिवस बंदही पाळला. रिक्षाचालक एकत्र येत असतील तर रिक्षाचालकांचा मुजोरपणाविरोधात नागरिकांनी एकत्र येऊन लढा का देवू नये या विचारातूनच ही स्वाक्षरी मोहिम राबवत असल्याचे म्हसकर यांनी सांगितले.
रोझलॅंड रेसिडेन्सीचे सचिव चंदन चौराशिया यांनी याबाबत सांगितले की, येथील सोसायटीत बहुतांशी आयटीतील नोकरदार राहतात. त्यांना कधीही वेळी-अवेळी बाहेर, कामावर जावे लागते. मात्र, रिक्षाचालक इच्छित स्थळी येण्यास टाळाटाळ करतात किंवा अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. काही लोक वेळीची गरज म्हणून ते करतात. मात्र, महिला, अपंग व वृद्धांकडूनही रिक्षाचालक अवाजवी पैसे आकारतात. रिक्षा चालकांची एकी एखाद्याने जाब विचारल्यास संबंधिताला एकही रिक्षा चालक घेऊन जात नाही. काही रिक्षाचालकांचा चांगला अनुभव आहे. मात्र, इतरांनी त्यांचे अनुकरण करून व्यावहाराने व मीटरने पैसे घ्यावेत अशी आमची इच्छा आहे. यामुळे नागरिकांनाही त्रास होणार नाही व रिक्षाचालकांनाही योग्य मोबदला मिळावा यासाठी आम्ही ही स्वाक्षरी मोहिम राबवत आहोत. शहरातील नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा व होणा-या अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन चंदन चौराशिया यांनी केले आहे.