आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यिक डाॅ. घुमटकर यांच्यावर शाई फेकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डाेंबिवली येथे हाेणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. जयप्रकाश घुमटकर यांच्या अंगावर बुधवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीजवळ दुचाकीहून अालेल्या दोघांनी शाईफेक केली. तसेच प्रचार थांबविण्याची धमकीही त्यांनी दिल्याची तक्रार घुमटकरांनी केली अाहे. दरम्यान, पाेलिसांनी या संशयितांचा शाेध सुरू केला अाहे. दुसरीकडे, घटनास्थळाच्या पाहणीवरून ही घटना बनाव अाहे का? यादृष्टीनेही तपास केला जात अाहे.

डाॅ. घुमटकर यांनी सांगितले की, ‘संमेलनाच्या अध्यक्षपदाचा उमेदवार असल्याने मी सध्या राज्यभरात फिरत अाहे. साेलापूरचा दाैरा करून मंगळवारी रात्री मी पुण्यात अालाे. बुधवारी सकाळी गणेश मळ्याकडून पत्रकार भवनाकडे जात असताना दुचाकीवरील दोघांनी मला अडवले. ‘ये घुमटकर, तुझे पुराेगामी महाराष्ट्राचे नाटक बंद कर, तुझा पुण्यातील प्रचार थांबव….नाही तर तुझे नाटक थांबवावे लागेल,’ अशी धमकी त्यांनी दिली. त्यानंतर लगेच त्यांनी अंगावर शाई फेकली व पळून गेले. यापूर्वीही ठाण्यातील माजी खासदार सतीश प्रधान यांनी मला उमेदवारी मागे घेण्यासाठी सांगितले हाेते. मात्र, मी उमेदवारी मागे न घेता प्रचार सुरूच ठेवला आहे. विचाराची लढाई विचारनेच झाली पाहिजे, साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या िनवडणुकीच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे निंदनीय कृत्य झाले अाहे. याप्रकरणी मी हल्लेखाेरांविराेधात पाेलिसात तक्रार दाखल केली आहे.’

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता रस्त्यावर किंवा बाजूच्या भिंतीवर शाईचे डाग आढळले नाहीत. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या कठड्यावर मात्र शाईचे डाग दिसून अाले अाहेत. पाेलिसांनी घटनास्थळावरून शाईची बाटली ताब्यात घेतली आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पाेलिसांकडून केली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...