आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डाॅन काे पकडना नामुमकिन’चा SMS पाठवणारा शकील जेरबंद, इनोव्हा चोराने घरावर लावले कॅमेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या वेशभूषेतील आरोपी सय्यद शकील. - Divya Marathi
वेगवेगळ्या वेशभूषेतील आरोपी सय्यद शकील.
पुणे- ‘अॅप’वर बुकिंग करून भाड्याने कार घेऊन ती चाेरणाऱ्या बुलडाण्यातील सराईत गुंडासह त्याच्या अाैरंगाबादेतील साथीदारास पुण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने माेठ्या शिताफीने अटक केली.  या अाराेपीने १२ इनाेव्हा कार चाेरल्याची कबुली दिली असली तरी प्रत्यक्षात त्याने पुणे, जालना, मुंबई, जळगाव, अाैरंगाबाद अादी माेठ्या शहरांतून ५० हून अधिक कारची चाेरी केल्याचा संशय पाेलिसांना अाहे.

चाेरीच्या कार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून चाैकशीत अाणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अाहे. विशेष म्हणजे राज्यभर वाॅन्टेड असणारा हा अाराेपी ‘डाॅन काे पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है’ असे अाव्हान देणारे मेसेजही पाेलिसांना पाठवत असे.

सय्यद शकील सय्यद युसूफ (रा. जवाहरनगर, बुलडाणा) असे मुख्य अाराेपीचे नाव असून त्याचा साथीदार महंमद एजास जलालुद्दीन काझी (४९,रा. मुर्गी नाला, चेलीपुरा, अाैरंगाबाद) यालाही पाेलिसांनी अटक केली. सय्यद शकीलवर बुलडाणा, जळगावात यापूर्वीही गुन्हे दाखल अाहेत. त्याच्याकडील चाैकशीत अनेक धक्कादायक व रंजक गाेष्टींचा खुलासा झाला. शकील हा बुलडाण्यातील जुना बाजार शिवाजी स्टेडियमजवळ येणार असल्याची खबर पुण्यातील गुन्हे शाखेचे पाेलिस कर्मचारी गजानन साेनुने यांना माहिती मिळाली हाेती. त्यानुसार वरिष्ठ पाेलिस िनरीक्षक नितीन भाेसले पाटील यांचे पथकाने बुलडाण्यात सापळा रचला अाणि  दाेघांना अटक केली. चाैकशीदरम्यान सय्यद शकील याने चिंचवडमधून एक कार चाेरून ती हैदराबादमध्ये विकल्याची कबुली दिली. पाेलिसी खाक्या दाखवताच एकुण १२ इनाेव्हा कार चाेरल्याची कबुली पाेलिसांकडे दिली अाहे.

अाॅनलाइन बुकिंग करून चाेरायचा गाड्या  
अाराेपी सय्यद शकील बुलडाण्यातून अाॅनलाइन अॅपवरून बाहेरगावी जाण्यासाठी अालिशान गाड्या बनावट नाव, पत्त्या देऊन बुक करत असे. जळगाव, जालना येथे जायचे असल्याचे ताे सांगत असे. सय्यदचे राहणीमान उच्चभ्रू लाेकांना शाेभेल असेच हाेते. भाड्याने गाडी घेतल्यानंतर ताे जळगावमार्गे जालना जिल्ह्यातील भाेकरदन, बदनापूर भागात यायचा. मात्र, या गावाजवळ येताच चालकाला पैसे देऊन पाण्याची बाटली घेऊन ये किंवा जेवण करून ये म्हणून बाहेर पाठवायचा. मात्र, जाताना गाडीतील एसी चालूच राहू दे, हे सांगण्यासही विसरत नव्हता. चालक गाडी साेडून बाहेर गेल्याची संधी साधून अाराेपी कार घेऊन पलायन करत असे. नंतर व्हेइकल अॅपवर ज्या गाड्यांचे नंबर बुक नाहीत असे क्रमांक शाेधून त्याची नंबर प्लेट चाेरीच्या गाड्यांना लावायचा व त्या गाड्या अांध्र, कर्नाटक राज्यांत विक्री करत असे.  

‘अारटीअाे’तील एजंट बनला अट्टल चोर  
शकील हा बुलडाणा अारटीअाे कार्यालयात तीन वर्षे एजंट हाेता. त्यामुळे या कार्यालयातील वाहनांच्या नाेेंदणीबाबत इत्थंभूत माहिती त्याला हाेती. अारटीअाे अधिकाऱ्याच्या बनावट सह्या करून त्याने अनेक गाड्यांची नाेंदणी केल्याचे उघडकीस अाले अाहे.  याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी चक्क बुलडाणा अारटीअाे कार्यालय तीन दिवस बंद ठेवण्याची वेळ अाली हाेती.  

अाराेपीच्या घराबाहेर २५ कॅमेरे; बंगल्यातून ठेवायचा पाळत  
शकील याचे बुलडाण्यातील घरावर २५ सीसीटीव्ही अाहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यावर त्याची नजर हाेती. या इमारतीला पाच गेट अाहेत. पाेलिस अाल्याचे दिसले की ताे खुश्कीच्या मार्गाने पसार व्हायचा. इतकेच नव्हे, कार चाेरताना कुठेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये अडकणार नाही याची काळजीही तो घ्यायचा. २०१० च्या गुन्ह्यात अजिंठा पाेलिसांनी अटक केल्यानंतर शकीलने चाैकीतच डाेके फाेडून घेतले व  पाेलिसांवर मारहाणीचा अाराेप केला हाेता. याप्रकरणी चार पाेलिसांना निलंबितही करण्यात अाले हाेते. 

पुण्यातील पाेलिसांनी अाराेपीच्या घराशेजारीच ठाेकला मुक्काम  
सय्यद शकीलच्या शाेधासाठी पुण्यातील पाेलिस कर्मचारी गजानन साेनुने यांनी बुलडाण्यात येऊन अाराेपीची सखाेल चाैकशी केली. तेव्हा दुसऱ्या बायकाेसह अाराेपी बुलडाण्यातील एकतानगरमध्ये राहत असल्याचे समजले. त्यानुसार साेनुने यांनी या घराच्या शेजारीच भाड्याने घर घेऊन काही दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठाेकला. तसेच दाेन मुलांच्या मदतीने सय्यद शकीलच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. अलीकडेच एका रात्री अाराेपी घरी अाल्याची खबर कळताच पुणे व बुलडाणा पाेलिसांनी घरावर छापा टाकून शकील व त्याच्या साथीदारास अटक केली.  

मुंबई पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार : जालना, जळगाव, हैदराबाद, मुंबई, ठाणे पाेलिसांना शकील ‘वाँटेड’ हाेता. त्याला पकडण्यासाठी पाेलिस अाले की त्याला अाधीच माहिती कळत असे. मुंबई येथील पाेलिसांचे एक पथक त्यास नुकतेच पकडण्यास अाले हाेते, मात्र त्यांच्या डाेळ्यात धूळ फेकून अाराेपी फरार झाला हाेता. इतकेच नव्हे, तर या पथकातील पाेलिस निरीक्षकास त्याने ‘डाॅन काे पकडना मुश्कील ही नहीं, नामुमकीन है’ असा मेसेजही पाठवला हाेता. 

पुढील स्लाइडवर वाचा... कार चाेरीस गेल्यानंतर जिद्दीने वाहन मालकाकडून पाठपुरावा  
बातम्या आणखी आहेत...