आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर ब्रायफेन वायर लावणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील धाेकादायके ठिकाणे व खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्राची मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते व युवासेनेचे अध्यक्ष अादित्य ठाकरे यांनी पाहणी केली त्यानंतर द्रुतगती महामर्गावरील वाहनांचा अतिवेग, लेन कटिंगच्या समस्यांमुळे हाेणारे अपघात टाळण्यासाठी ९५ किलाेमीटर अंतरावर सुरक्षेची ब्रायफेन वायर लावण्याच्या सूचना अायअारबी कंपनीला देण्यात अाल्या अाहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अलिकडच्या काळात द्रुतगती महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. द्रुतगती महामार्गवरील धाेकादायक ठिकाणे, खंडाळा घाटातील दरड क्षेत्राची तसेच बाेगद्यांमधील लाइटची व एसअाेएस सिस्टीमची पाहणी करण्यात अाली अाहे. तेथे आवश्यकतेनुसार बदल केले जातील. खंडाळा घाटातील वाहतुक काेंडी व अपघातांची समस्या साेडविण्यासाठी दस्तुरी ते कुसगाव या दरम्यान भुयारी मार्ग बनविण्यात येणार असून त्याची पाहणी करण्यात अाली अाहे. द्रुतगती महामार्गावर काेणती दुर्घटना घडल्यास तातडीने सेवा पुरविण्यासाठी चार शीघ्रसेवा पुरविणारी वाहनांची साेय करण्यात येईल.