आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होती साऊथ फिल्मची अॅक्ट्रेस, आज MLA पतीसोबत करते पॉलिटिक्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या पतीच्या कार्यक्षेत्रात राजकारण करू लागली आहे नवनीत कौर राणा - Divya Marathi
आपल्या पतीच्या कार्यक्षेत्रात राजकारण करू लागली आहे नवनीत कौर राणा
मुंबई- महाराष्ट्रातील फडणवीस सरकार स्थिर आहे. शिवसेनेने पाठिंबा काढला तरी फडणवीस मुख्यमंत्रीपदीच राहतील. आम्ही सहा अपक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सोबत शिवसेनेने पाठिंबा काढला तर शिवसेनेचे 20-22 आमदार आणि 3-4 मंत्री भाजपला साथ देतील असे वक्तव्य अमरावतीतील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे. शिवसेनेने राणांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे. पण रवी राणांची भाजपसोबतची जवळीक स्पष्ट होत आहे. बोलले जात आहे की, राणा लवकरच भाजपवासी होतील. तसेच आपली अभिनेत्री पत्नी नवनीत कौर राणा ही सुद्धा भाजपमध्ये जाईल व अमरावतीतून आगामी लोकसभेत भाजपची उमेदवार असेल अशी अटकळ बांधली जात आहे.नवनीत यांनी 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविली. मात्र, त्यांना शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी धूर चारली. राजकारणात येण्याआधी नवनीत फिल्म पंजाबी आणि साउथ इंडियन फिल्ममध्ये सक्रिय अभिनेत्री राहिली आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न....
 
- अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत नवनीत कौर यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. 
- 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात 3162 जोडप्यांनी लग्न केले होते. त्यात 2443 हिंदू, 739 बौद्ध, 150 मुस्लिम, 15 ख्रिश्चन आणि 13 अंध जोडप्यांचाही समावेश होता. 
- आमदार रवी राणा यांच्या लग्नामुळे या सोहळ्यात अनेक दिग्गज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. 
- त्यात तत्‍कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योग गुरू रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय देखील सहभागी झाले होते.

कन्नड फिल्ममधून करियरची सुरुवात- 
 
- नवनीत कौरचा जन्म 3 जानेवारी, 1986 रोजी मुंबईत झाला होता. कौरने बहुतेक तेलुगु फिल्ममध्ये काम केले. नवनीतचे माता-पिता मूळचे पंजाबी आहेत. 
- तिचे पिता आर्मी ऑफिसर होते. 12 वी पास झाल्यानंतर नवनीतने शिक्षण सोडून एक मॉडेल म्हणून काम करणे सुरु केले. या दरम्यान तिने 6 म्यूजिक अल्बममध्ये काम केले.
- नवनीतने कन्नड फिल्म 'दर्शन' पासून आपल्या फिल्मी सफरला सुरुवात केली. याशिवाय नवनीतने तेलुगु फिल्म सीनू, वसंथी आणि लक्ष्मीमध्ये सुद्धा अॅक्टिंग केली. 
- 2005 मध्ये तेलुगु फिल्म चेतना, जग्पथी, गुड बॉय आणि 2008 मध्ये भूमामध्ये तिने काम केले. ती रियालिटी शो हुम्मा-हुम्मामध्ये एक कंटेस्टेंट म्हणून सहभागी झाली होती.
- नवनीतने मलयालम फिल्म 'लव इन सिंगापुर' शिवाय पंजाबी फिल्म 'लड़ गए पेंच' मध्ये काम केले. 
 
वाद आणि नवनीत कौर एक पक्के समीकरण-
 
- पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत कौर -राणा यांनी मार्च 2014 मध्‍ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमरावतील लोकसभा निवडणूक लढवली होती. 
- हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. त्यावेळी विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप केला होता. 
- त्यानंतर स्थानिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
- याशिवाय काही दिवसांपूर्वी नवनीत यांनी त्यांच्या फोटोशी छेडछाड करुन फेसबुक आणि व्हॉट्स्अपवर पोस्ट केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती. त्यांनी हे विरोधकांचे कृत्य असल्याचे म्हटले होते.
 
रामदेव बाबांच्या आश्रमात झाली रवी राणांची भेट-
 
- नवनीत यांना योगाची आवड आहे. त्या योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिष्य आहेत.
- पती रवी राणा हे देखील रामदेव बाबांना मानतात.
- रामदेव बाबा यांच्या एका शिबीरातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली होती.
- त्यानंतर दोघांनी रामदेव बाबांच्या परवानगीनेच नाते संबंध वाढविले.
- 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर नवनीत यांनी चित्रपटांना रामराम केला.
- योग गुरू रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय या लग्‍नसोहळ्यात सहभागी होते.
- "इंडिया बुक ऑफ रेकॉड', "लिमका बुक ऑफ रेकॉर्ड' तसेच "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये या सोहळ्याची नोंद झाली होती.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नवनीत कौर यांची खासगी आणि राजकीय आयुष्यातील निवडक छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...