Home »Maharashtra »Pune» International Film Festivel Starts Today In Pune

पुण्यात आजपासून रंगणार आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सव

प्रतिनिधी | Jan 10, 2013, 02:25 AM IST

  • पुण्यात आजपासून रंगणार आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्सव

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित अकराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन (पिफ) गुरुवारी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आणि वनमंत्री पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.

सिटीप्राइड कोथरूडमध्ये सायंकाळी पाच वाजता उद््घाटन सोहळा रंगेल. यानिमित्ताने आठवडाभरात चित्रपट रसिकांना 52 देशांतील दोनशेहून अधिक निवडक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमात चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ कारकीर्द यशस्वी केल्याबद्दल अभिनेते जितेंद्र आणि रमेश देव यांना विशेष सन्मान प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुमधुर संगीताने चित्रपट गाजवणारी संगीतकार जोडी शिवहरी (पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया) यांना संगीतकार सचिनदेव बर्मन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटांच्या शताब्दीचे औचित्य साधून व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल संस्थेचे विद्यार्थी या उद्घाटन समारंभात विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. या महोत्सवाद्वारे चित्रपट रसिकांसाठी पर्वणीच उपलब्ध होत आहे.
52 देशांतील 200 हून अधिक चित्रपट

उद्घाटनासाठी एपिलॉग या इस्रायली चित्रपटाची निवड

जितेंद्र आणि रमेश देव यांचा विशेष गौरव
संगीतकार शिवहरी यांना एस. डी. बर्मन अवॉर्ड
स्पर्धा विभागातील ज्युरींची उपस्थिती

Next Article

Recommended