आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - दहशतवादी कारवाया करणारी इंडियन मुजाहिद्दीन (आय.एम) संघटना पुणे स्फोटाशी संबंधित असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध एजन्सी त्यादृष्टीने चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्फोटात मोठी जीवितहानी अथवा वित्तहानी न झाल्यामुळे इंडियन मुजाहिद्दीन संघटना स्फोटाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसावी अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुणे शहरात 13 फेब्रुवारी 2010 मध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटात इंडियन मुजहिद्दीनचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दगडूशेठ हलवाई मंदिरासमोर त्याच दिवशी स्फोटाचा कट करण्याचा इंडियन मुजाहिद्दीनचा डाव उघडकीस आला होता. या कटाशी संबंधित आय.एमचा सदस्य मोहम्मद कातिल सिद्दीकी याचा मोहोळ टोळीकडून खून करण्यात आला. या खुनाचा बदला व बॉम्बस्फोटाचा फसलेला कट या पाश्वर्भूमीवर हा साखळी स्फोट करण्यात आला का याचा पोलिस तपास करत आहे. या स्फोटात टायमर, डिटोनेटर, 9 व्होल्ट पेन्सिल सेल, बॉल बेरिंग या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या साहित्यासोबत अमोनियम नायट्रेटही होते का याबाबतची माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील अहवालानंतरच उपलब्ध होणार आहे.
स्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याच्या चौकशीत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तपास यंत्रणेतील निवडक अधिका-यांचे विविध गट करून त्यांना तपासकामे वाटून देण्यात आली आहे. जर्मन बेकरी स्फोटातील तपास अधिकारी या स्फोटांचा तपास करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.