आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराला घरपण देणारा माणूस \'डीएसके\' अडचणीत, पुण्यात असा आहे आलिशान बंगला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'घराला घरपण देणारी माणसं' अशी ओळख असणारे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यालगत 300 एकर जागेवर डीएसके ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ तयार करण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. पैशांची उभारणी करण्यासाठी त्यांनी कर्जरुपात अनेक गुंतवणुकदारांना मुदत ठेवींवर 12 टक्के व्याज देण्याचे अमिष दाखविले होते. मात्र, नोटबंदीनंतर बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे डीएसके गोत्यात येऊन त्यांना गुंतवणुकदारांना परतावा करणे अशक्य बनले. त्यामुळे अशा हवालदिल झालेल्या गुंतवणुकदारांनी बुधवारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डीएसकें विरोधात तक्रार अर्ज दिल्याने डीएसके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डीएसके यांचा पुण्यात आलिशान बंगला आहे. त्यांनी आपल्या घराचे घरपण अत्यंत कलात्मक पद्धतीने जपले आहे. हिरवागार डोंगर, खळखळणारे झरे आणि डोळ्यांना सुखद अनुभूती देणार्‍या झाडा-झुडपांच्या सानिध्यात साकारलेले डीएसकेंचे घर प्रत्यक्ष स्वप्ननगरीच भासते.
तब्बल 40 हजार पुणेकरांना हक्काचे घर दिल्यानंतर त्यांनी बांधलेल्या स्वत:च्या घरातील कोपरा न कोपरा वैविध्यपूर्ण आहे. जगातील विविध भागातून संग्रहित केलेल्या वस्तूमुळे त्यांचे घर पुण्याची नवी ओळख ठरत आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...घराला घरपण देणारे डीएसके यांचा आलिशान बंगला...
बातम्या आणखी आहेत...