आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई Vs कोलकाताच्या लढतीदरम्यान पुण्यात 4 बुकींना पकडले, 58,200 रुपयांचा ऐवज जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आयपीएल-10 मधील मुंबईविरूद्ध कोलकाता लढतीचे फोनवरून बुकींग घेऊन जुगार खेळताना पुण्यात चौघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. आज (सोमवारी) पहाटे 4 वाजेच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.  


मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव (खुद्द) येथील तावरे फार्मवर पोलिसांनी काल (रविवारी) रात्री साडे दहा वाजता सापळा रचून छापा टाकला. राजेश कांतीभाई कक्कड (34, रा.बालाजीनगर, धनकवडी), दत्तात्रय चंद्रकांत जगताप (28, रा.विद्यानगरी, धनकवडी, पुणे), विजय मोहन तावरे (44, रा. 272 नाना पेठ, पुणे), संजय नटवरलाल शहा (47,  रा.पद्मावती, पुणे) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून क्रिकेट बुकिंगचे साहित्य एलईडी टीव्ही विविध कंपनीचे मोबाईल फोन कॅलक्युलेटर असा 58,200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, कॉन्टेबल प्रदीप गुरव, विनोद भांडारकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, समीर बागसिराज, बाबा नरळे यांनी ही कारवाई केली आहे.
बातम्या आणखी आहेत...