आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8: Preity Zinta Cheer Kings Xi Punjab 2015 At Pune Against DD

PHOTOS: कधी आनंदी तर कधी निराश दिसली प्रिती झिंटा...पहा अंदाज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दिल्ली डेयरडेविल्सने किंग्स इलेवन पंजाबचा बुधवारी रात्री 11 धावांनी पराभव करीत या मोसमातील पहिला विजय मिळवला. किंग्स इलेवन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 165 धावा केल्या. याला उत्तर देताना दिल्लीने युवराज सिंह (55) आणि मयंक अग्रवाल (68) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर व शतकी भागीदारीने दिल्लीने 5 विकेटने सामना जिंकला.
पुण्यातील गहुंजे येथे झालेल्या या सामन्याला किंग्स इलेवन पंजाबची को-ऑनर प्रिती झिंटा उपस्थित होती. या सामन्यादरम्यान प्रितीचे अनेक अंदाज पहायला मिळाले. जेव्हा पंजाबचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग वेगाने फलंदाजी करीत होता तेव्हा प्रिती एकदम खूष व आनंदी दिसत होती. सेहवागने चौकार-षटकार ठोकताच ती आनंदाने उड्या मारताना दिसली. काही वेळा ती डान्स करतानाही दिसली. मात्र, दिल्लीच्या युवराज व मयांकने फटकेबाजी सुरु केली तसा प्रितीचा आनंद ओसरू लागला. युवराजची फटकेबाजी पाहून ती आपली निराशा लपवू शकली नाही.

अरबाज खान पोहचला चीयर करायला- प्रिती झिंटाची टीम पंजाबला चीयर करण्यासाठी बॉलिवूड अभिनेता अरबाज खान उपस्थित होता. त्याच्याशिवाय टीमचा को-ऑनर नेस वाडिया उपस्थित होता.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, प्रिती झिंटाचे वेगवेगळे अंदाज...