आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवीचा पंजाबला दणका!, दिल्लीचा पहिला विजय; गुणतालिकेत दिल्ली चाैथ्या स्थानावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जबरदस्त फाॅर्मात अालेल्या युवराज सिंगने झंझावाती फलंदाजी करून किंग्ज इलेव्हन पंजाबला जबर दणका दिला. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पंजाबवर ५ गड्यांनी मात केली. युवी (५५) अाणि मयंक अग्रवाल (६८) यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर दिल्लीने सामना जिंकला. यासह दिल्लीचा संघ विजयी ट्रॅकवर अाला अाहे. हा दिल्ली संघाचा यंदाच्या सत्रातील पहिला विजय ठरला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने ७ बाद १६५ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने १९.५ षटकांत पाच गड्यांच्या माेबदल्यामध्ये लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली संघाकडून युवराज सिंग, मयंक अग्रवाल यांनी झंझावाती फलंदाजी केली. तसेच कर्णधार जेपी डुमिनीने २१, श्रेयस अय्यरने ६ धावांचे याेगदान दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. किंग्ज इलेव्हन पंजाबने दमदार सुरुवात केली. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (४७) अाणि मुरली विजयने (१९) संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जाेडीने ३३ धावांची भागीदारी केली. दरम्यान, सेहवागने वृद्धिमान साहासाेबत (३९) दुसऱ्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली.

मिलर, मॅक्सवेल अपयशी : पंजाब टीमने एक वेळ १ बाद १०४ धावा काढल्या हाेत्या. या वेळी टीम माेठी धावसंख्या उभी करेल, असे चित्र हाेते. मात्र, मधल्या फळीतल्या फलंदाजांना समाधानकारक खेळी करता अाली नाही. ग्लेन मॅक्सवेल, जाॅर्ज बेली व डेव्हिड मिलर अपयशी ठरले. त्यामुळे शेवटच्या षटकात टीमला वेगाने धावा काढता अाल्या नाहीत.

ताहिरचे तीन बळी
दिल्ली टीमचा फिरकीपटू इम्रान ताहिरने शानदार गाेलंदाजी करताना तीन बळी घेतले. यासह त्याने स्पर्धेत अापल्या नावे एकूण अाठ विकेटची नाेंद केली.
पुढील स्लाइडवर युवीचा आणि अग्रवालचा झंझावात...