आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 फुट उंच आहेत या दबंग महिला IPS, रोडरोमिओंच्या धुलाईसाठी आहेत प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस ज्योतिप्रिया सिंह (IPS) - Divya Marathi
डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलिस ज्योतिप्रिया सिंह (IPS)
पुणे - लोकप्रीय IPS अधिकारी ज्योतिप्रिया सिंह यांना दबंग महिला अधिकारी म्हणूनही ओळखल्या जाते. त्या सध्या पुण्यात डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. ज्योतिप्रिया यांची हाइट चक्क 6 फूट आहे. पोस्टिंग कुठेही असो रोड-रोमिओंवर त्यांच्याकडून झालेल्या कारवायांमुळे त्यांच्या भागात छेडछाड करणारे सुद्धा 10 वेळा विचार करतात. कोल्हापूर येथे अतिरिक्त एसपी असताना त्यांनी चक्क तत्कालीन शिवसेना आमदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करून माध्यमांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष वेधले होते.
 

वडील होते कमांडर...
- ज्योतिप्रिया यांचा जन्म लखनऊमध्ये झाला होता. त्यांनी लखनऊ विद्यापीठातून Zoology विषयात M.Sc. केले आहे. 
- त्यांचे वडील रणवीर सिंह 35 व्या बटालियनचे अॅसिस्टंट कमांडर होते. तर त्यांच्या आई ऐना सिंह महिला डिग्री कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत. 
- त्यांचे पती मुंबईत राहतात आणि त्यांना एक मुलगा आहे. 
- M.Sc. च्या विद्यार्थिनी राहिलेल्या सिंह यांना 82 टक्के गुण मिळाले होते. त्यांना आपल्या महाविद्यालयात 'मिस झूलॉजी' असा क्राऊन मिळाला होता. 
 
 
बास्केटबॉल प्लेयर...
- ज्योतिप्रिया 2008 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. ज्योती लहानपणा पासूनच IAS होण्यास इच्छुक होत्या. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत 171 वे रँक मिळाले आणि त्यांना IPS कॅडर घ्यावे लागले. 
- त्या बास्केटबॉल प्लेअर होत्या. या खेळात त्यांनी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात विविध स्तरावर नाव कमवले होते. 
- पुणे आणि जालन्यात काम करण्यापूर्वी त्या कोल्हापुरात अतिरिक्त एसपी पदावर कार्यरत होत्या. 
- 2002-03 मध्ये त्यांना चान्सलर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. अभ्यास व्यतीरिक्त ज्योतिप्रिया स्पोर्ट्समध्ये देखील पुढे होत्या.
 

यामुळे आल्या होत्या चर्चेत
- कोल्हापुरात अतिरिक्त एसपी पदावर कार्यरत असताना आयपीएस ज्योतिप्रिया सिंह यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार राजेश क्षिरसागर आणि समर्थकांच्या विरुद्ध केस दाखल केली होती. 
- गणेश विसर्जनाच्या वेळी काही कथित शिवसेना कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांची छेड काढली होती. त्यावर संतप्त झालेल्या ज्योतिप्रिया यांनी छेडछाड विरुद्ध एमएलए क्षिरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे, मोठा राजकीय दबाव आल्यानंतरही त्यांनी केस परत घेतली नाही. 
 

बाईकवर फिरुन रोडरोमिओंची धुलाई
- कोल्हापुरात अतिरिक्त एसपी म्हणून तैनात असताना काही मुली त्यांच्याकडे सतत होणाऱ्या छेडछाडीची तक्रार घेऊन पोहोचल्या होत्या.
- त्याची गंभीर दखल घेत ज्योतिप्रिया यांनी विशेष मोहिम हाती घेतली. यात त्या आपल्या टीमसोबत साध्या वेशात बाइकवर फिरायच्या आणि कुणीही मुलींची छेड काढताना दिसून आल्यास जागीच चोप द्यायच्या... 
- त्यांच्या या धडक कारवाईमुळे कोल्हापुरातील रोडरोमिओंच्या मनात भिती निर्माण झाली होती. एकाच दिवशी 80 रोडरोमिओंना पकडून त्या प्रसिद्ध झाल्या.
बातम्या आणखी आहेत...