आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISची पुणे ATSला धमकी, भानुप्रताप बर्गेंसह कुटुंबियांना ठार मारण्याचा ई-मेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दहशतवादी संघटना ISIS ने पुणे दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) धमकी दिल्‍याची धक्‍कादायक माहिती बुधवारी समोर आली. पुणे एटीएसला ई-मेल करून ISIS ने ही धमकी दिली आहे. पुणे एटीएसचे सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्‍यासह कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धकमीचाही या ईमेलमध्ये उल्लेख आहे.
‘एटीएस’ कार्यालयाबाहेर बंदोबस्‍त
- भानुप्रताप बर्गे हे दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पुणे युनिटचे सहायक आयुक्त आहेत.
- ISIS च्‍या धमकीला मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.
- इसिसच्‍या धमकीनंतर ‘एटीएस’ कार्यालयाबाहेर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्‍त वाढवण्‍यात आल्‍याची माहिती आहे.
इसिसविरोधात एटीएसची सतर्कता...
‘एटीएस’च्या पुणे विभागाने मागील काही दिवसात सतर्क राहून इसिसविरोधात तरूणांमध्‍ये जनजागृती केली. ISIS च्या प्रभावाखाली आलेल्‍या एका तरुणींसह अन्य दोन तरुणांचे मन वळविण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. पुण्यातून ताब्यात घेतलेल्या युवतीवर गुन्हा दाखल न करता तिचे समुपदेशन केले गेले. त्यामध्येही यश आले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, एटीएसने इसिसविरोधातील उचललेली पावलं....