आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे एटीएस प्रमुख बर्गेंना इसिसची धमकी, पोलिस आयुक्तालयात आले निनावी पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ मुंबई - दहशतवादविरोधी पथकाचे पुणे येथील सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना कुटंुबीयांसह ठार मारण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र मुंबई पोलिस आयुक्तालयाकडे आले आहे. या पत्रामुळे पोलिस दलात खळबळ माजली असून इस्लामिक स्टेट (इसिस) या संघटनेनेच ही धमकी दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे येथील एका महाविद्यालयीन तरुणीला इसिसच्या प्रभावातून बाहेर काढण्यात बर्गे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच मुंबईतून बेपत्ता होऊन इसिसच्या मार्गावर असलेल्या तीन तरुणांपैकी एकाला पकडण्यात बर्गे यांच्या पथकाने कामगिरी केली होती.