आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट मृत्युपत्र देऊन फरार आरोपीला अटक, हैदराबाद-सांगलीत चाेऱ्या करून पुण्यात स्थायिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी इस्माईल पीर महंमद शेख - Divya Marathi
आरोपी इस्माईल पीर महंमद शेख
पुणे - कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांना बनावट मृत्युपत्र देऊन गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला चिंचवड येथे अटक केली आहे. इस्माईल पीर महंमद शेख (५५) असे आरोपीचे नाव आहे.

इस्माईल याच्या नावावर अनेक छोट्या- मोठ्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशाच प्रकारे त्याने हैदराबाद येथेही अनेक चोऱ्या केल्या होत्या. हैदराबाद येथील एका गुन्ह्यात फरार झाल्यानंतर त्याचा माग काढत हैदराबाद पाेलिस अाराेपीच्या घरापर्यंत पोहोचले. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी इस्माईल याचे निधन झाल्याचे सांगत पोलिसांना मृत्यू प्रमाणपत्र दाखवले. त्यामुळे हैदराबाद पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने इस्माईल याची माहिती काढली असता तो घराला बाहेरून कुलूप लावून आत राहत असल्याचे समजले. त्यानुसार छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. इस्माईल शेख हा २०१० पासून फरार होता. त्याने हैदराबाद येथील कट्टनगूर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत व सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे गेल्या वर्षी चोरी केली
होती. भाेसरी येथेही अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात अाली हाेती.

दोन मुली डॉक्टर,
एक मुलगा अभियंता

इस्माईल शेख यांच्या नावावर अनेक पोलिस ठाण्यांत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्या कुटुंबाची माहिती काढली असता पोलिसही चक्रावून गेले. इस्माईल याला दोन मुली व दोन मुले आहेत. त्याच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत, तर एक मुलगा अभियंता आहे. दुसऱ्या मुलाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...