आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कमीत कमी ऊर्जा आणि पैशांचा वापर करून प्रभावी संपर्क यंत्रणा राबवणारा, संपूर्णपणे विद्यार्थ्यांनी विकसित केलेला ‘स्वयम्’ सॅटेलाइट (उपग्रह) प्रक्षेपणासाठी सज्ज झाला आहे. २० जून रोजी ‘द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’च्या (इस्रो) श्रीहरीकोटा येथील तळावरून हा सॅटेलाइट अंतराळात झेपावणार आहे. इस्रोच्या कार्टोसॅट सी अंतर्गत पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेइकलमार्फत (पीएसएलव्ही ३४) ‘स्वयम्’ चे प्रक्षेपण होईल आणि एका ऐतिहासिक घटनेची नोंद केली जाईल.

आठ वर्षांपूर्वी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सॅटेलाइट विकसित करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तीन बॅचेसनी मिळून हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण केला आहे. हे स्वप्न प्रथम पाहणारे विद्यार्थी होते निश्चय मराठे, अभिषेक बाविसकर आणि मोहित कर्वे. तेव्हा ते अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात होते. ‘आयआयटीने आम्हाला त्यांच्या सॅटेलाइटसाठी ग्राउंड स्टेशन तयार करण्याची ऑफर दिली होती. तेव्हा आपणच सॅटेलाइट बनवावा, हा विचार अाला. त्यासाठी टीम बनवली आणि कॉलेजला तसा प्रस्ताव सादर केला. जानेवारी २००९ मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला आणि लगेच कामाला सुरुवात झाली, असे निश्चय मराठे म्हणाला. या सर्व प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यावर आम्हाला अनेक आव्हाने आली आणि खूप प्रयत्न करून आम्ही सर्वांनी ती पेलली आणि अखेर विद्यार्थ्यांच्या सॅटेलाइटचे आमचे स्वप्न साकार होत आहे, असेही तो म्हणाला. सुमारे १७६ विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात हातभार लावला.

खर्च ५० लाखांवर
>स्वयम् सॅटेलाइटच्याप्रक्रियेत सर्वांत मोठे आव्हान होते, ते विद्यार्थ्यांच्या तीन पिढ्यांमधील प्रेरणेचा स्रोत कायम ठेवण्याचे.. पण साऱ्यांनीच झपाटून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात योगदान दिले. कॉलेज व्यवस्थापन आणि सर्व अध्यापकांनी कामाचे स्वातंत्र्य दिले, प्रकल्पासाठी ५० लाख उपलब्ध केले. अगदी कमी खर्चात आम्ही स्वयम् ची निर्मिती करू शकलो.आता पुन्हा सॅटेलाइट बनवायचा तर आम्ही निम्म्या खर्चात तो करू शकतो, हा आत्मविश्वास आहे. निश्चय मराठे, विद्यार्थी.
>स्वयम् अंतराळात ५०० ते ८०० किमी उंचीवर तो स्थिर राहावा, यासाठी मॅग्नेटोक्यूर्स प्रणालीने ताे स्थिर केला जाईल. त्यासाठी उच्च क्षमतेचे रॉडस आणि चुंबकांचा वापर केला आहे. स्वयम्ची अंॅटेना संदेश ग्रहण करण्यासाठी सतत पृथ्वीच्या दिशेने ठेवली जाणार आहे.
> मे २०१५ मध्ये सॅटेलाइटची सर्व उभारणी पूर्ण झाली होती. नंतर सर्व प्रकारच्या चाचण्या घेण्यात अाल्या. बंगलोरमधून क्रिटिकल डिझाइन रिव्ह्यू करून घेतला. अधिकाधिक निर्दोष, कमी खर्चातला आणि कमीतकमी ऊर्जेचा वापर करणारा, असा स्वयम् आहे.
असा आहे पिको स्वयम् सॅटेलाइट
>वजन - किलोग्रॅम
> आकार - १०,१०,१० सेंटिमीटर क्यूब
> प्रणाली - डब्ल्यू पॉवरपेक्षाही कमी क्षमतेची
> सहा मुखांवर सौरपॅनेल्स
> लिथियमच्या बॅटऱ्या
> पॅसिव्ह अॅटिट्यूड कंट्रोल सिस्टिमद्वारे नियंत्रण
> अॅनॉलाॅग कम्युनिकेशन सिस्टिम
> नॉइज कॅन्सलेशन सॉफ्टवेअर
> सॅटेलाइट एका दिवसात पृथ्वीच्या सहा प्रदक्षिणा करणार
बातम्या आणखी आहेत...