आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफटीअायअाय’मध्ये अाता निहलानी- विद्यार्थी लढा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी पुकारलेला १३९ दिवसांचा संप, हे केवळ एक अांदाेलन ठरणार नाही, तर दृक््श्राव्य रूप लघुपट वा चित्रपटाच्या माध्यमातून आता त्याचे नवे रूप समाेर येण्याची चिन्हे अाहेत. अर्थात संपकरी विद्यार्थी आपल्या बाजूच्या समर्थनार्थ, तर सेन्सॉर मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी सरकारच्या बाजूने या लघुपटाची ‘निर्मिती’ करणार असल्याची चर्चा कलावर्तुळात आहे.

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चाैहान यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना हटविण्यासह इतर मागण्यांसाठी या संस्थेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दीर्घकाळ धुमसत राहिले. चर्चा, वाद, आरोप, राजकीय मंडळींचा वावर.. अशी बरीच वळणे या आंदोलनाने घेतली. अखेर काेणताही ताेडगा न निघता विद्यार्थ्यांनीच आंदोलन मागे घेतले, पण आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांनी केलेले रोजचे चित्रीकरण आता लघुपट स्वरूपात थेट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या विचारात विद्यार्थी आहेत. इतकेच नव्हे, तर २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू होणाऱ्या केंद्र शासनाच्या अधिकृत चित्रपट महोत्सवातही लघुपट विभागात या फिल्म्स दाखवण्याची ‘तयारी’ विद्यार्थ्यांनी केल्याचे समजते. दुसरीकडे या आंदोलनावर स्वतंत्र चित्रपट वा माहितीपट करण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनीही घेतला आहे. या माहितीपटात विद्यार्थ्यांच्या ‘अँटी नॅशनॅलिझम’वर भाष्य करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
‘निहलानींना हटवा ’
एफटीअायअायचे अध्यक्ष गजेंद्र चाैहान यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे या संस्थेचे विद्यार्थी अाता पहलाज निहलानींच्या हकालपट्टीचीही मागणी करू लागले अाहेत. ‘सेन्सॉर बोर्डासारखी महत्त्वाची संस्था पहलाज निहलानींसारख्यांच्या ताब्यात असणे धोक्याचे आहे. देशाची चित्रपट संस्कृतीच त्यामुळे धोक्यात येत आहे. त्यामुळे निहलानींना तातडीने हटवा,’ अशी मागणी विद्यार्थी संघटनेने पाठवलेल्या पत्रकात करण्यात आली आहे.