आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...हा तर एफटीआयआय बंद पाडण्याचाच डाव, अांदाेलक विद्यार्थ्यांचा संस्थेवर अाराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -‘आम्ही ४२ दिवसांपासून शांततामय आंदोलन करत आहोत. मात्र, दोन दिवसांपूर्वी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करणे, मग गुन्हा दाखल करणे, संस्थेत अमली पदार्थांचे सेवन केले जाते असे सांगून गस्त घालणे, काही संघटनांनी विद्यार्थ्यांच्या अटकेची मागणी करणे. हे सारे प्रकार म्हणजे संस्था बंद पाडण्याचा डाव आहे. आंदोलनाचा मूळ हेतू डावलून वेगळ्याच वळणावर हे प्रकरण नेण्याचा हा कट आहे,’ असा आरोप फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अाॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला.
संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चाैहान व इतर सदस्यांच्या नियुक्तीला विराेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा शुक्रवारी ४३ वा दिवस होता. संस्थेचे कर्मचारी संजय चांदेकर यांनी दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी केबिनमध्ये येऊन धमकावल्याची तक्रार डेक्कन पोलिसांत केली होती. याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संस्थेत बेकायदेशीरपणे अमली पदार्थांचे सेवन केले जाते, असे सांगितल्याने संस्थेत गस्त सुरू करण्यात आली. तसेच २४ तास पोलिस पहाराही ठेवण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्थेचा कथित प्रश्न उपस्थित करत हे सारे पूर्वनियोजित असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्वांमागे कोण आहे, याची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘पतित पावन’चा मोर्चा
विद्यार्थ्यांनी धमकावल्याप्रकरणी संस्थेचे कर्मचारी संजय चांदेकर यांनी
पोलिसांत तक्रार दाखल केली अाहे. या विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना अटक करा, या मागणीसाठी पतित पावन संस्थेच्या वतीने शुक्रवारी संस्थेपासून डेक्कन पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
‘राहुल, हस्तक्षेप करा’
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मद्रास आयआयटी प्रकरणात लक्ष घातले होते. तसेच आता या प्रकरणीही त्यांनी हस्तक्षेप करावा, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.