आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Its Failure Of Government To Not Finding Dabholkar\'s Killer Ajit Pawar

दाभोलकरांचे मारेकरी न सापडणे ही नाचक्की - अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार महिने झाले तरी अजूनही पोलिसांना त्यांच्या मारेक-यांपर्यंत पोहोचता आले नाही. ही नाचक्की असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारला शुक्रवारी घरचा आहेर दिला.
येथे दौलतदार जाधव प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या 56 व्या दीक्षांत समारंभानंतर बोलताना पवार म्हणाले, दाभोलकर यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांच्याशी आपण अनेकदा तपासाबाबत चर्चा केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस योग्य पद्धतीने करत आहेत. त्यामुळे सीबीआयकडे हे प्रकरण देण्याचा सध्याच प्रस्ताव नाही.
उपमुख्यमंत्र्यांनी बंद केल्या हातभट्ट्या : सर्वपक्षीय दहा आमदारांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सकाळी सात वाजता उरुळीकांचन येथे गेले. त्या ठिकाणी त्यांना कचरा डेपोशेजारी दोन हातभट्ट्या सुरू असलेल्या दिसल्याने त्यांनी तातडीने त्या बंद पाडल्या. पोलिस आयुक्तांनाही यासंदर्भात धारेवर धरले. पोलिस आयुक्त गुलाब पोळ हे अजित पवारांसमोर हजर होताच लोकांच्या गर्दीसमोर आमदार गिरीश बापट यांनी आयुक्तांना ‘सदर भागातील पोलिस निरीक्षक व पोलिस उपायुक्त काय करतात? नुसते गोड गोड बोलू नका, तर त्यांना निलंबित करा,’ असे सुनावले. उपमुख्यमंत्र्यांनी असे चित्र पुन्हा दिसले तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.