आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jai Gangajala Film Promotion News In Divya Marathi

पुणे एटीएसचे अधिकारी रमले ‘जय गंगाजल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्‍ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- इसिस, इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा अशा विविध दहशतवादी संघटनांचे मनसुबे उधळवून लावण्याचे काम दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करते. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात इसिसमध्ये तरुणांची भरती करणाऱ्या आणि देशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट एनआयएने एटीएसच्या मदतीने देशात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून उधळून लावला. मात्र, पुणे एटीएसच्या कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या पत्रकार परिषदेत रमल्याचे शनिवारी दिसून आले.

पुणे एटीएसच्या कार्यालयात एरवी दहशतवादी कारवायांशी संबंधितांची चौकशी केली जात असल्याने, तशी तुरळकच गर्दी असते. त्यातच पुणे एटीएसचे एसीपी भानुप्रताप बर्गे यांना इसिस समर्थकांनी कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी दिल्याने, एटीएस कार्यालयाला पुणे पोलिसांनी सशस्त्र पहारा दिला आहे. मात्र, शनिवारचा दिवस हा एटीएसचे कार्यालय नव्हे तर चित्रपट प्रमोशनचे ठिकाण बनले. एटीएसच्या कार्यालयात "जय गंगाजल' चित्रपटातील अभिनेत्री प्रियंका चोप्राचे पोलिस वर्दीतील जाहिरातीचे होर्डिंग लावून साउंड सिस्टिमवर चित्रपट प्रमोशनचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला.

या वेळी एटीएसचे अधिकारी व कर्मचारीही रुबाबदारपणे एकसारखे पांढरे शर्ट, काळी पँट, गळ्यात एटीएसचे आयकार्ड घालून दिसले. दिग्दर्शक प्रकाश झा, अभिनेता मानव पॉल, सहदिग्दर्शक मिलिंद दबके, एटीएसचे एसीपी भानुप्रताप बर्गे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे या वेळी उपस्थित होते.
प्रतिष्ठा जपणे महत्त्वाचे
^चित्रपटात पोलिस आणि समाजातील संबंध दाखवण्यात आले आहेत. एटीएसचे काम महत्त्वपूर्ण असून त्यांचे काम अनेकदा झाकोळले जाते. पोलिसांचा खरा चेहरा, समस्या, त्यांचे समाजातील स्थान समोर आणण्यासाठी चित्रपट तयार केला आहे. जे खाकी वर्दी घालतात त्यांनी खाकीची प्रतिष्ठा राखणे महत्त्वाचे आहे.
प्रकाश झा, दिग्दर्शक
एटीएसची चांगली प्रतिमा
पुणे एटीएसने इसिसच्या कारवाईत सहभागी होणाऱ्या एका अल्पवयीन युवतीचे मन:परिवर्तन केले. मुस्लिम समाजातील मान्यवरांसोबत बैठका घेऊन इसिसविरोधात जागृती केली आहे. त्यामुळे मुस्लिम कुटुंबात एटीएसची चांगली प्रतिमा बनली आहे.
भानुप्रताप बर्गे, एसीपी, एटीएस