आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी, नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मध्यमेश्वर आणि लोणार सरोवर या तीन जागांचा समावेश ‘रामसर साइट’च्या जागतिक पाणथळ स्थळांच्या (वेट लँड) यादीत होण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य वन्यजीव महामंडळाची सातवी बैठक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पुण्यात झाली. या वेळी हा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली. वनमंत्री पतंगराव कदम या वेळी उपस्थित होते. देशातील 25 पाणथळ स्थळांचा समावेश आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ यादीत आहे. यात महाराष्ट्रातील एकही स्थळ नव्हते. हा प्रस्ताव मान्य झाल्यास रामसर यादीत महाराष्ट्र प्रथमच झळकणार आहे. केंद्राच्या पातळीवर छाननी झाल्यानंतर प्रस्ताव पुढे युनेस्कोकडे पाठवण्यात येईल.
‘रामसर’ यादीत समावेशामुळे पाणथळ जागांच्या परिसरात पर्यावरणाची जपणूक व संवर्धन काटेकोरपणे करता येणार आहे. जागतिक वारसा (वर्ल्ड हेरिटेज) म्हणून नोंद झाल्यानंतर या जागांच्या पर्यावरणपूरक विकासासाठी जागतिक संस्थांकडून निधी मिळवणे सुलभ होणार आहे. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहकार्यातून जागांचा ‘वाइज युज’ व्हावा, मानवी ढवळाढवळ होऊ न देता या जागांचा शाश्वत विकास ही ‘रामसर’ची मूळ संकल्पना आहे.
रामसर म्हणजे काय?
‘रामसर’ हे इराणमधील शहराचे नाव. 1971 मध्ये येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचा मुद्दा तत्त्वत: मान्य झाला. याबाबत मसुदा 1975 मध्ये अस्तित्वात आला. रामसर परिषदेत त्यावर चर्चा झाल्याने यात निवडल्या जाणा-या पाणथळ जागांना ‘रामसर साइट’ संबोधले जाते. सरोवर, नद्या, तलाव, गवताळ पाणथळ मैदाने, खाडी, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो.
सर्वाधिक ‘रामसर’ स्थळांचे देश
देश स्थळे एकूण क्षेत्र (हेक्टर)
कॅनडा 3७ 1 कोटी 30 लाख ६६,675
रशिया 35 1 कोटी 3 लाख 23,७६७
मेक्सिको 13८ ८८ लाख 2६,429
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.