आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा- मुख्यमंत्र्यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभरातील कारागृह अधिकारी व कर्मचारी हे पाेलिसांप्रमाणेच साेयी-सुविधा तसेच कॅशलेस वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी करत अाहेत. या पार्श्वभूमीवर कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा लवकरच लागू करण्यात येईल, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात केली. त्याचप्रमाणे नवीन पाेलिस भरती वेळी काही जागा शिल्लक ठेवून त्या कारागृह प्रशासनासाठी भरल्या जातील, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा सन -२०१६ च्या उद््घाटन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी प्रधान सचिव डाॅ. विजय सतबीरसिंघ, अपर पाेलिस महासंचालक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, शहाजी साेळुंके, येरवडा कारागृह अधीक्षक यू. टी. पवार उपस्थित हाेते.

मुख्यमंत्री म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पाेलिस प्रशासन करत असतानाच कारागृह प्रशासन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अाहे. मार्ग चुकलेल्या कैद्यांना याेग्य मार्गावर अाणून त्यांचे पुनर्वसन करणे महत्त्वपूर्ण अाहे. अनेक वेळा कैदी कारागृह कर्मचाऱ्यांना सहकार्य करत नाहीत. अशा कैद्यांना सांभाळण्याचे जिकिरीचे काम कर्मचारी करतात. अनेक वर्षे कारागृह प्रशासन दुर्लक्षित राहिलेले असून ज्या पद्धतीने त्यांचा विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. कारागृहात माेबाइल सापडतात तेव्हा मला दु:ख हाेते. अशा गाेष्टी हातमिळवणीशिवाय शक्य नाहीत. अशा प्रवृत्तींना अापण विराेध केला पाहिजे. कारागृहाची सुरक्षितता व अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याकडे लक्ष दिले पाहिजे. सर्वच स्तरांतील कैद्यांना न्यायालयात ने-अाण करणे कारागृह प्रशासनासमाेरील माेठी अडचण अाहे. त्यासाठी कारागृहातून व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगवर भर िदला पाहिजे.

औरंगाबाद कारगृहाचे महानिरीक्षक आर. टी. धामणे यांचा सत्कार याप्रसंगी राष्ट्रपतिपदक विजेते अाैरंगाबाद कारागृहाचे महानिरीक्षक अार. टी. धामणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला.
औरंगाबादसह मुंबई-पुण्यात नवे कारागृह
राज्य कारागृहाचे महानिरीक्षक डाॅ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, क्रीडा स्पर्धेत कारागृहाच्या पाच विभागांतील एकूण ८२३ खेळाडू सहभागी झाले अाहेत. ज्या खेळाडूंची कामगिरी चांगली हाेईल त्यांना हैदराबाद येथे अाॅल इंडिया प्रिझन मीट स्पर्धेसाठी पाठवले जाईल. राज्यातील कारागृहांत माेठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत असून त्यासाठी तंत्रज्ञानावर भर िदला जात अाहे. राज्यातील कारागृहांत एक हजार सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले असून अागामी पाच महिन्यांत अाणखी ५०० सीसीटीव्ही लावले जातील. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व कारागृहांचे काम लवकरच संगणकीकरण करून केले जाईल. मुंबई, पुणे, अाैरंगाबाद येथे नवीन कारागृहांची उभारणी केली जात असून त्यातून कारागृहावरील ताण कमी केला जाईल.