आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर लवकरच मुख्य प्रवाहात येईल : मंत्री जयराम रमेश, सरहद संस्थेचा कार्यक्रम पुण्यात उत्साहात संपन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जम्मू-काश्मीर हे आपल्या देशाचे अविभाज्य अंग आहे. काश्मीरमध्ये शांतता नांदावी, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. काश्मीरसाठीच्या सरकारच्या योजनांना यश मिळत आहे आणि लवकरच काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी पुण्यात  ‘काश्मीर महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी केले.   
 
‘सरहद संस्थे’तर्फे आयोजित काश्मीर महोत्सवात रमेश यांच्यासह जम्मू-काश्मीरचे पर्यटन संचालक मेहमूद शाह, फलोत्पादन संचालक महंमद हसन मीर, संयोजक शैलेश पगारिया, आतिश चोरडिया, सरहदचे संजय नहार, शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते.    
 
‘काश्मीरशिवाय देश अपुरा अधुरा आहे,’ अशी भावना व्यक्त करत जयराम रमेश म्हणाले,‘काश्मीरमधील अशांत वातावरण निवळावे म्हणून सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न झाले आणि सुरू आहेत.
 
काश्मिरी युवकांना रोजगार देणारी ‘उडान’, महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणारी, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारी ‘उम्मीद’, दहावी अनुत्तीर्णांना प्रशिक्षण देऊन रोजगार देणारी ‘हिमायत’ अशा योजनांना सकारात्मक प्रतिसाद आहे.
 
 तसेच घटनात्मक जबाबदारीचे भानही सरकार ठेवत आहे. पर्यटन विभागही प्रयत्नशील आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे. ‘सरहद’चे योगदानही यामध्ये महत्त्वपूर्ण आहे.’ मेहमूद शाह म्हणाले, ‘गेल्या वर्षी १३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...