आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मी तानाजी व्हायला तयार, नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकरांची परखड भूमीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तानाजी किंवा शेलारमामा होण्यास तयार - जयंत सावरकर (फाईल) - Divya Marathi
मी तानाजी किंवा शेलारमामा होण्यास तयार - जयंत सावरकर (फाईल)
पुणे - आपल्याकडील चुकीच्या राजकीय व्यवस्थेमुळे मराठी रंगभूमीवरील कलाकारांची होणारी वाताहात आणि नाट्यगृहांच्या राजकीय वापरावर मी यापुढेही लढा देत राहणार आहे. एखादी व्यक्तीच्या जाण्याने रंगभूमीचे भले होणारे असेल तर, मी तानाजी किंवा शेलारमामा होण्यास तयार आहे, असे परखड मत 97 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
 
यंदा होणारे नाट्य संमेलन नियोजित कार्यक्रमानुसार पार पडले. संमेलनाच्या समारोपापूर्वी नाट्य परिषदेच्या विविध शाखांचे अध्यक्ष आणि पदाधिकारीसमवेत नियामक मंडळाची बैठक झाली असून अध्यक्षस्थानी असलेल्या सावरकर यांनी राजकारण्यांमुळे नाट्यगृहाचे आणि रंगभूमीवरील कलाकारांचे होणारे हाल या दिर्घकाल अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे परखड मत व्यक्त केले. 
 
जयंत सावरकर म्हणाले...
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नाट्यगृह आहेत. परंतु, ही नाट्यगृहे महानगरपालिकेच्या किंवा तेथील स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने या ना्टयगृहांवर रंगभूमीवरील कलाकारांपेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधींचाच अंकूश असल्याचे दिसून येते.
 
अनेकदा नाट्य निर्मात्यांनी नाट्यगृहाच्या तारखा नियमानुसार आरक्षीत केलेल्या सतात. त्याचे भाडे भरलेले असते,  जाहीराती केलेल्या असतात, कलाकारांच्या तारखा जुळवलेल्या असतात या प्रक्रीयेत नाट्यनिर्मात्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झालेली असते. अशा वेळी लोकप्रतिनिधी कुठलीच पर्वा न करता त्यांचे राजकीय हितसंबंध रेटून नेहण्यासाठी नाटकासाठी आरक्षीत तारखा आयत्यावेळी ताब्यात घेतात. याचा संपूर्ण फटका नाट्यनिर्मात्याला आणि कलाकारांना बसतो.
बातम्या आणखी आहेत...