आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JEE Mains News IN Marathi, Interview, Divya Marathi

जेईई मेन्स, सीईटीसाठी मोफत मौखिक परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांचे स्वरूप बदलत असून पूर्वी प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या एमएच-सीईटी परीक्षेऐवजी आता जेईई-मेन्स ही प्रवेश परीक्षा असणार आहे. यंदा सहा एप्रिल रोजी होणा-या या परीक्षेसाठी देशात सुमारे 20 लाख विद्यार्थी बसणार आहेत. आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र व स्मार्ट कॉम्प्युटर्स संयुक्त विद्यमाने या परीक्षेसाठी मोफत मौखिक परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांनी दिली.


मंगेशकर म्हणाले, मोठा अभ्यासक्रम व चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण असणारी जेईई मेन्स परीक्षा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहे. प्रथमच घेतल्या जात असलेल्या या परीक्षेची पद्धत व त्यात विचारल्या जाणा-या प्रश्नांचे स्वरूप याविषयी विद्यार्थ्यांत संभ्रमाचे वातावरण आढळत आहे. हीच स्थिती वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आहे. एमएच-सीईटीही त्यासाठी प्रवेश परीक्षा असून परीक्षेच्या क्रमिक अभ्यासक्रमात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. विस्तृत अभ्यासक्रम व नकारात्मक गुण पद्धत या नवीन स्वरूपास विद्यार्थ्यांना तोंड द्यायचे असून ही प्रवेश परीक्षा 8 मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांत परीक्षेचा गोंधळ दूर करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राने मोफत ऑनलाइन टेस्टिंग सुविधा उपलब्ध केली आहे.


www.parikshan.org या संकेतस्थळावर जेईई-मेन्स व एमएच-सीईटी परीक्षांची मॉक टेस्ट देता येणार आहे. त्यानंतर या परीक्षांबाबत विस्तृत माहिती, गुणांकन व परफॉर्मन्स फीडबॅक विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी मोफत परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.