आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeep Truck Accident, Five People Killed, Six Injured At Baramati

बारामतीजवळ ट्रक - जीपचा भीषण अपघात, पाच भाविक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - तुळजापूरहून देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांच्या जीपला भरधाव ट्रकने धडक दिल्याने पाच जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना बारामती- इंदापूर राज्य महामार्गावर रविवारी घडली. मृत हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील हिवरे गावाचे रहिवासी आहेत.

किरण बाळासाहेब कुदळे (४०),रखमाबाई एकनाथ गायकवाड (५५),स्वाती अशोक बोरावके (४३),लक्ष्मीबाई शंकर गायकवाड (८०), सुरेखा नामदेव कुदळे (४५) अशी मृतांची नावे आहेत, तर भाग्यश्री रमेश कुदळे (१८), मोनिका किरण कुदळे (३५),पूजा परशुराम कुदळे (१८), मंजुषा पांडुरंग कुदळे (२०),तेजश्री संतोष गायकवाड (३ वर्षे), चैतन्य किरण कुदळे (२ वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत अाहेत.
तुळजापूर येथून देवदर्शन करून सर्वजण आपल्या झायलो गाडीतून परत निघाले होते. या वेळी महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. यात पाच जण जागीच ठार झाले. दरम्यान, या महामार्गावर सायंकाळच्या वेळी सूर्यकिरण थेट चालकाच्या डोळ्यावर येत असल्याने याआधीही अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.