आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जिजाऊ प्रकाशन'ला धमकीचे पार्सल; जिलेटीन पाठवले, पाेलिसात तक्रार दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संभाजी ब्रिगेडशी संबंधित जिजाऊ प्रकाशनाच्या पुणे कार्यालयाच्या पत्त्यावर अज्ञातांनी जिलेटीन या स्फोटकाचे पार्सल पाठवल्याचे रविवारी उघडकीस अाले.
पुण्याच्या जिजाऊ प्रकाशनच्या पत्त्यावर काही जिलेटनची पाकिटे आणि वृत्तपत्रांतील काही कात्रणे असलेली पाकिटे पाठवण्यात आल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अजय भोसले यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी या संदर्भात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या आक्षेपार्ह पार्सलमध्ये स्फोटक पदार्थांच्या पाकिटांबरोबरच वृत्तपत्रांची काही कात्रणेही आहेत. या कात्रणांतील बातम्यांमधल्या काही नेत्यांच्या नावांवर लाल फुल्या मारण्यात आल्या आहेत. या पार्सलवर पुण्यातल्याच टिळक रस्त्यावरील पोस्ट ऑफिसचा शिक्का आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार खोडसाळपणाचा आहे की यामागे काही विघातक हेतू आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...