आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पाेलिसाला मारहाण; न्यायाधीशाच्या पतीवर गुन्हा, CCTV फुटेज व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील कर्वेनगर रस्त्यावर स्वातंत्र्य चाैक येथे १६ अाॅगस्ट राेजी वाहतूक पाेलिस कर्मचारी रवींद्र इंगळे यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या महिला न्यायाधीशाचे पती व त्यांच्या मुलीविरोधात पाेलिसांनी गुरुवारी डेक्कन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे.
 
श्याम विश्वासराव भदाणे (रा.न्यायाधीश निवास, ८ क्वीन्स गार्डन,पुणे) असे त्यांचे नाव आहे. इंगळे हे स्वातंत्र चाैक कर्वे राेड येथे वाहतुकीचे नियमन करत असताना श्याम भदाणे यांनी सिग्नल ताेडले. त्यामुळे इंगळे यांनी त्यांना दंड भरण्यास सांगितले. रागाच्या भरात भदाणे यांनी इंगळे यांच्या अंगावर दुचाकी घातली. याला विरोध केला असता भदाणे आणि त्यांच्या मुलीने इंगळे यांना मारहाण करत आपण न्यायाधीशांचे पती असल्याचे त्यांना सांगत शिवीगाळ केली. ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याने पोलिसांनी भदाणे व त्यांच्या मुलीविरोधात अखेर गुन्हा दाखल केला.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा व्हिडिओ आणि जाणुन घ्‍या काय होते संपूर्ण प्रकरण...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...