आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ साहित्यिक ज्योत्स्ना देवधर यांचे पुण्यात निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कथा, कादंब -या व ललित लेखनातून मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवणा -या ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर (87) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या, नात व नातसून असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्योत्स्नाबार्इंचा जन्म 27 फेब्रुवारी 1926 रोजी राजस्थानातील जोधपूर येथे झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. ‘अंतरा’ हा त्यांचा पहिला हिंदी कथासंग्रह केंद्र सरकारच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.