आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर मंचचे तीन कार्यकर्ते पुणे पोलिसांच्या ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - डाव्या विचारधारेशी संबंधित संघटना असलेल्या कबीर कला मंचच्या तीन कार्यकर्त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सरकारने बंदी घातलेले प्रक्षोभक गाणे आंदोलनाच्या वेळी म्हटल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सिध्दार्थ भोसले, रुपाली जाधव व दीपक ठेंगळे अशी त्यांची नावे आहेत. भंडारा डोंगर संपूर्णपणे संरक्षित करावा या मागणीसाठी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्यावतीने सोमाटणा फाटा येथे शुक्रवारी रस्ता रोको करण्यात आला. या वेळी भरिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांसोबत कबीर कला मंचाचे तिन्ही कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनादरम्यान प्रक्षोभक गाणी गायल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. याच संघटनेची कार्यकर्ती शीतल साठेला गुरूवारीच न्यायालयाने जामीन दिला आहे.