आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalmadi Allege On Pac For Political Intention Behind Commonwealth Game Scam Blame

‘पीएसी’वर कलमाडींचा पलटवार !, राजकीय हेतूने ठपका ठेवल्याचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात झालेल्या राष्‍ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहार प्रकरणी लोकलेखा समितीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत केलेली शिफारस एकतर्फी आहे. राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेवत माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत, अशा शब्दांत पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट यांच्यावर गुरुवारी पलटवार केला.

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांना कलमाडी जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला भरावा, अशी मागणी आमदार गिरीश बापट यांनी विधानसभेत केली होती. पाच वर्षांपूर्वी पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा झाली होती.

स्पर्धेच्या आयोजनात तसेच खेळाडूंसाठी सुविधा, क्रीडा प्रकारांचे बांधकाम करताना अनेक ठिकाणी गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा ठपका लोकलेखा समितीने ठेवला आहे. याची जबाबदारी कलमाडींची असल्याचे सांगत बापट यांनी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांकडे तक्रार केली होती.

साक्ष घेतलीच नाही
आरोपांबाबत खुलासा करताना कलमाडी म्हणाले, ‘लोकलेखा समितीने कोणतेही आरोप करण्यापूर्वी मला साक्षीकरिता बोलावणे आवश्यक होते, परंतु मला बोलावण्यात आलेले नाही. ज्या खर्चासंदर्भात लोकलेखा समितीने शिफारस केली, त्यासंदर्भात चार्टर्ड अकाउंटंटनी दिलेले पत्र यापूर्वीच राज्य शासनाला देण्यात आलेले आहे.’

गिरीश बापटांनी बांधले लोकसभेसाठी बाशिंग?
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळ्यात अडकल्याने पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बापट यांनी तयारी सुरू केली आहे. याचा संदर्भ घेत खासदार कलमाडी म्हणाले, ‘आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय हेतूने आरोप केल्याचे दिसून येते. याचा मला खेद होतो.’