आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलमाडींच्या घरासमोर अभाविपची निदर्शने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - खासदार सुरेश कलमाडी यांना न्यायालयाने दिलेल्या जामिनानंतर ते पुण्यात कधी येणार, याची उत्सुकता शुक्रवारी समर्थकांमध्ये होती. मात्र पुनरागमन कलमाडींसाठी फारसे सुखावह ठरणार नसल्याची चिन्हेही आहेत. शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कलमाडी यांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर निदर्शने केली.
कलमाडी यांना अटक करा, खासदारकीचा राजीनामा घ्या, कलमाडी हाय हाय, कलमाडी यांचा धिक्कार असो, गली गली में शोर है, कलमाडी चोर है, भ्रष्टाचारियो सावधान, जाग उठा है नौजवान, खिलाडियों का खिलाडी, भ्रष्टाचारी कलमाडी अशा प्रकारची घोषणाबाजीही या कार्यकर्त्यांनी केली. कलमाडी हे पुण्याचे खासदार असल्याने गुरुवारी तुरुंगातून बाहेर येताच ते पुण्याला भेट देतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी कायदेशीर बाबी, कागदपत्रांची छाननी तसेच न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याने कलमाडी यांना इतक्या लवकर पुणे गाठता येणे अवघड आहे, असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.