आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणित, इंग्रजी विषयाला पर्याय देण्याचा निर्णय आत्मघाती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दहावीच्या निकालातील नापासांचा टक्का कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि गणित विषयांना पर्याय देण्याचे सूतोवाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र हा विचार आत्मघातकी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडणारा आहे, अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी सोमवारी येथे केली.
बदललेल्या संचमान्यतेनुसार, गणित आणि विज्ञान विषयाला एकच शिक्षक देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याला भर म्हणून महत्त्वाचे विषयच अभ्यासक्रमातून हद्दपार करणे, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडणारा प्रकार आहे. इंग्रजी ही जगाची भाषा आहे तर गणित जीवनात पदोपदी उपयोगात येत असते. हे विषय काढून टाकून शिक्षणमंत्र्यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल पाटील यांनी केला.

नव्या संचमान्यतेनुसार तीन चार भाषांना एकच शिक्षक असल्याचे नमूद केले आहे. कमी पटसंख्येच्या शाळेत त्यामुळे गणित आणि विज्ञानासाठी एकच शिक्षक असेल. संचमान्यतेच्या या नव्या निकषांमुळे राज्यातील सर्वसामान्य मुलांचे शिक्षण उद््ध्वस्त केल्यासारखे होणार आहे. तावडेंविषयी वैयक्तिक आकस नाही पण त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे अजेंडे ठरवले जात आहेत, त्यामुळे तावडे बदनाम होत आहेत, असेही पाटील म्हणाले.

मागण्यांविषयी सकारात्मक प्रतिसाद
कपिलपाटील यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या घेऊन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांची भेट घेतली. या वेळी कुमार यांनी मागण्यांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिक्षक सेवकांना सामावून घेणे, अन्य भाषांच्या शिक्षकांचा प्रणालीत समावेश करून गेणे, अशैक्षणिक कामांतून सुटका याविषयी आयुक्त आश्वासक बोलले, असे त्यांनी सांगितले.

काय आहेत अटी
{बायोमेट्रिक हजेरी विद्यार्थी शिक्षकांना आवश्यक
{ शेवटच्या वर्गात २० - ३० पेक्षा कमी तर अनुदान नाही
{ २०१५ - १६ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यता
{ इयत्ता वी १० वी चा निकाल १०० टक्के असावा
{ सलग तीन वर्षे निकष प्राप्त केल्यास शाळेची मान्यता रद्द
{ अनुदानाचा स्वेच्छाधिकार - निधी उपलब्धतेनुसार अनुदान
अनुदानासाठी ऑक्टोबरपासून आंदोलन
विनाअनुदानित आणि कायम विना अनुदानित शाळांना शासनाने २० टक्के अनुदान देण्याचे मान्य केले आहे. याविरोधात राज्यातील शिक्षक ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.
शासनाने १९ सप्टेंबरला हा निर्णय जाहीर केला आणि लगेच या अनुदानासाठी काही अटीही जाहीर केल्या. त्या मान्य नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे पाटील म्हणाले. २०१५-१६ साठी जी संचमान्यता जाहीर करण्यात आली, त्यानुसार अनुदान देण्यात येणार आहे. यातून राज्यातील शिक्षण व्यवस्थाच मोडू पाहत आहे. विना अनुदानित शिक्षकांना पगार द्यायचे नाहीत, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक अधिक दाखवून त्या शाळा बंद पाडायच्या, असा दुहेरी डाव सरकार खेळत असल्याची टीका पाटील यांनी केली. सरकारचे धोरण शिक्षकविरोधी आहे. याचा निषेध म्हणून राज्यव्यापी आंदोलन सनदशीर मार्गाने, केले जाईल. गजानन खरात वशिवाजी पावले या शिक्षकांच्या आत्महत्यांना शासनच जबाबदार आहे. आजवर ११ शिक्षकांचे प्राण खर्ची पडले आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...