आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बेटी बचाअाे’चा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी सहकुटुंब सायकलवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘बेटी बचाअाे-बेटी पढाअाे’ असा संदेश देत जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ३४०० किलाेमीटरचा प्रवास पुण्यातील दहा वर्षांची मुलगी सर्इ पाटील हिने अार्इवडिलांसाेबत सायकलवर ३० दिवसांत पार केला अाहे. १३ राज्यांतून प्रतिदिन १०० ते १७० किलाेमीटरपर्यंतचा प्रवास करताना वेगवेगळे अनुभव सर्इ, तिची अार्इ जागृती व वडील सतीश पाटील यांनी घेतले अाहेत. देशात प्रथमच अशा प्रकारचा माेठा प्रवास सायकलवरून सहकुटुंब करण्यात अाला असून  या अनाेख्या प्रवासाची लिम्का बुक  व इंडिया बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डसकडून दखल घेण्यात अाली अाहे.     


सतीश पाटील हे उद्याेजक असून मूळ धुळ्याचे रहिवासी अाहेत. जम्मू येथून त्यांनी सहकुटुंब सायकलवर प्रवास सुरू करत पुढे लुधियाना, पानिपत, दिल्ली, अाग्रा, मथुरा, ग्वाल्हेर, लांजीतपूर, छिंदवाडा, नागपूर, हैदराबाद, बंगळुरू, सालेम, कन्याकुमारी असा त्यांनी प्रवास केला. 


सकाळी साडेपाच वाजता प्रवासाला सुुरुवात करत संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत सलग ३० दिवसांचे प्रवासाचे नियाेजन त्यांनी केले हाेते. प्रवासादरम्यान केवळ प्रवास मार्ग ठरलेला हाेता व मुक्कामाची व्यवस्था अगाेदर निश्चित करण्यात अाली नव्हती. सायंकाळी ज्या शहरात किंवा गावात पाेहचू त्याठिकाणी मुक्काम व्यवस्था करून राहयचे असे ठरविले हाेते.    


सतीश पाटील म्हणाले, काश्मीर ते कन्याकुमारी यापूर्वी काेणीही सहकुटुंब प्रवास केला नसल्याने प्रवासाच्या अनुषंगाने सर्व ठिकाणांवरून माहिती गाेळा केली. हा प्रवास करण्यापूर्वी वर्षभरापासून कुटुंबासह सायकल चालवण्याचा सराव केला. त्यासाठी जिममध्ये पत्नी, मुलीने तंदुरुस्ती वाढवली. याेग्य अहाराचे सेवन करत दरराेजच्या सायकल सरावातून मानसिकता बनवली. तीन ते चार वेळा घाटातूनही सायकल चालवण्याचा सराव केला.डिसेंबर महिन्यात सहकुटुंब चार दिवसात पुणे ते गाेवा हे ४६० किलाेमीटरचे अंतर सायकलवर पार केल्याने सर्वांचा अात्मविश्वास वाढला. माझ्या मुलीचे काश्मीर ते कन्याकुमारीदरम्यान सायकलवर प्रवास करण्याचे स्वप्न हाेते व ते पूर्ण झाले अाहे.    

बातम्या आणखी आहेत...