आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेलिनीसाठी ‘कट्यार’ची निवड, जगभरातून केवळ ११ चित्रपटांचीच झाली आहे निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अंड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिस आणि युनेस्को यांच्या मानाच्या फेलिनी पुरस्काराच्या स्पर्धेसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ या सध्या गाजणाऱ्या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे भारतातील हे पहिलेच वर्ष असून, या स्पर्धेसाठी निवड होणे हा सन्मान समजला जातो. तो मान ‘कट्यार’ने मिळवला आहे. गोव्यामध्ये रंगणाऱ्या ‘इफ्फी’ महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागातही ‘कट्यार’ची यापूर्वीच निवड झाली आहे.

फेलिनी पुरस्कारासाठी जगभरातून फक्त ११ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. त्यात ‘कट्यार’चा समावेश झाल्याने आनंद झाल्याची भावना दिग्दर्शक सुबोध भावेने व्यक्त केली. ‘कट्यार’ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान वाटते, असेही सुबोध म्हणाला. ‘हा केवळ चित्रपटाचा सन्मान नाही तर भारतीय अभिजात संगीताचा, नाट्यसंगीताच्या परंपरेचा, कट्यार हे नाटक गाजवणाऱ्या मान्यवर कलावंतांचा सन्मान आहे. हे साऱ्या टीमचे यश आहे,’ असेही सुबोध म्हणाला.
अभिमानाचा क्षण
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेसाठी निवड हा अभिमानाचा विषय वाटतो. फेलिनी पुरस्कार कान्समध्ये प्रदान केले जातात. यूनेस्कोच्या पुढाकाराने प्रथमच ही स्पर्धा भारतात होत आहे. अशा स्पर्धेसाठी ‘कट्यार’ निवडला जाणे, हे मराठी चित्रपटासाठीही महत्त्वाचे आहे.
निखिल साने, चित्रपटाचे निर्माते