आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedar Jadhav In Team India For Bangladesh Tour News In Hindi

बांग्‍लादेश दौ-यासाठी निवड झालेल्या केदार जाधवला राज्यात पैसे भरुनही सुविधा मिळेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांग्लादेश दौ-यासाठी महाराष्ट्राच्या केदार जाधवची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र त्याला सरावासाठी महिन्याला सुमारे 18 हजार रुपये भरावे लागत आहेत. स्वतः केदारने ही आश्चर्यकारक माहिती दिली आहे. आपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणा-या केदारला पुण्यात सरावासाठी पुरेशा सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांनी इतर ठिकाणी सरावासाठी पैसे भरावे लागत आहेत.
केदारने गेल्या रणजी सत्रामध्ये 1223 धावा केल्या होत्या. या प्रकारामुळे निराश झालेला केदार म्हणाला की, 'मी गेल्या 14 वर्षांपासून पुणे जिमखाना क्लबचे प्रतिनिधीत्व करतो. तरीही त्यांनी मला सराव करता यावा म्हणून खेळपट्टी तयार करण्यास नकार दिला.'

बांग्लादेश दौ-यासाठी सरावाचे काय असे, विचारले तेव्हा आपण 22 यार्ड क्रिकेट अकादमीला 18,000 हजार रुपये फीस देत असून त्याठिकाणच्या खेळपट्टीवर सराव करत असल्याचे त्याने सांगितले. स्वतःच्याच राज्यात अशी वागणूक का मिळते हेच कळत नसल्याचेही केदार म्हणाला. बांग्लादेश दौ-यासाठी सिलेक्टर्सनी आयपीएलमधील चांगली कामगिरी करणा-यांचा समावेश केला आहे. त्यापैकी काही युवा खेळाडू, देशाकडून पदार्पण करणार आहेत.

बांग्लादेश दौ-यासाठी निवड झालेले नवीन चेहरे...पाहा पुढच्या स्लाईड्सवर